काय सांगता ! होय, पतीला आत्महत्या करण्यास केले प्रृवत्त, नेटवर्किंग मार्केटिंगच्या दोघांवर FIR

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – नेटवर्किंग मार्केटिंग कंपनीमध्ये रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडून फसवणूक केल्याने आपल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, असा आरोप करत पत्नीने शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर कंपनीच्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

कृष्णात प्रकाश गोंड (33 रा. खोतवाडी, पो. माजगाव, ता. पन्हाळा) व किरण कांबळे-देसाई (रा. माजगाव, ता. पन्हाळा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. युवराज बाळू माने (रा. आसुर्ले) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अर्चना युवराज माने (28 रा. आसुर्ले) यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शाहुपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज माने यांनी 7 नोव्हेंबर 2020 रोजी कोल्हापुरात शाहुपुरीतील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याप्रकरणी मृत माने यांच्या पत्नी अर्चना यांनी मंगळवारी रात्री पोलिसात तक्रार दिली. मृत युवराज यांनी पत्नीचे दागिने विकून ते पैसे नेटवर्किंग मार्केटिंग कंपनीमध्ये गुंतवणूक केले होते. पैसे गुंतवणूक करण्यास कृष्णात गोड व किरण कांबळे-देसाई यांंनी भाग पाडले. त्यानंतर मानेंना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप पत्नी अर्चना हीने पोलिसांत केला आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.