Crime in Nagpur | पोलिसांच्या दाव्याची संशयिताने केली पोलखोल; म्हणाला – ‘चार महिन्यापासून बंद आहेत सीसीटीव्ही’

नागपूर न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Crime in Nagpur | नागपूर येथील इतवारी रेल्वे स्थानकात (Itwari railway station) प्रवाशाला लुटल्याप्रकरणी एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नागपूरमध्ये घडलेल्या या गुन्ह्यात (Crime in Nagpur) ज्यावेळी पोलिसांनी हा गुन्हा तूच केला असून सीसीटीव्ही (CCTV) मध्ये तू दिसत आहे असे सांगितले त्यावेळी या संशयिताने पोलिसांचीच पोलखोल केली. या संशयिताने चार महिन्यापासून रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे सांगितले (cctvs cameras are off from last 4 months) हे ऐकून पोलिसही चक्रावून गेले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, इतवारी रेल्वे स्थानकावर काही दिवसांपूर्वी चाकूचा धाक दाखवत एका प्रवाशाला लुटल्याची (Theft) घटना घडली होती.
या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित चोरट्याला ताब्यात घेतलं.
त्यावेळी पोलिसांनी प्रवाशाला तुच लुटलं असून ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचं या चोरट्याला सांगितल त्यावेळी आपण हे केलं नसल्याचा दावा केला.
सीसीटीव्हीच्या जोरावर पोलीस ठासून सांगत असतानाच त्या चोरट्याने चार महिन्यांपासून इतवारी रेल्वे स्थानकावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
त्यामुळे पोलिसांच्या दाव्याची चोरानं पोलखोल केली आहे.
या घटनेमुळे पोलीस ही चक्रावून गेले आहेत.

दरम्यान, इतवारी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एकूण 23 सीसीटीव्ही कॅमेरे लावले खरे
पण कॅमेरे बंद असल्याने केवळ शोभेसाठी हे सीसीटीव्ही असल्याची चर्चा नागरिकांतून सुरू झाली आहे.

Web Title : Crime in Nagpur | suspect in the police claim; he Said – ‘CCTV has been closed for four months’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri-Chinchwad Police | खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक, आरोपींकडून पिस्टल जप्त

KYC Update | केवायसी अपडेट पडले महागात; पोलिसांनी दोन तासात परत केले 1 लाख 60 हजार रुपये

Pegasus Effect | महाराष्ट्र सरकारचे फरमान, आवश्यक असेल तरच वापरा मोबाइल, अन्यथा लँडलाईनचा करा वापर