Crime News | आईवर प्रेम आणि मुलीसोबत अश्लिल चाळे; डबल गेम करणाऱ्या तरुणाला मायलेकींनी दिली शिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  काही दिवसांपूर्वी एका तरुणाची निर्घृणपणे हत्या (Crime News) करण्यात आली होती. या हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला. घटनेच्या पाचव्या दिवशी पोलिसांनी हत्येचं गूढ उलगडलं असून पोलिसांनी मायलेकींना अटक केली आहे. हि हत्या (Crime News) या मायलेकींनी केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. तसेच आरोपी मायलेकींकडून हत्येसाठी वापरलेली शस्त्र आणि काही पुरावे ताब्यात घेण्यात आले आहेत. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. हि घटना नोएडा (Noida) शहरातील एक्सटेंशन (Extension) या ठिकाणी घडली आहे.

 

मृत व्यक्तीचं आरोपी महिलेशी प्रेमसंबंध सुरू होते. तसेच मृत तरुणाची आरोपी महिलेच्या मुलीवर देखील वाईट नजर होती. आरोपी तिची नेहमी छेड काढायचा.
आरोपी महिलेनं आपल्या प्रियकराची अनेकदा समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण त्याचा या तरुणावर काहीच फरक पडला नाही.
त्यामुळे आरोपी महिलेनं आपल्या मुलीशी संगनमत करून प्रियकराच्या हत्येचा कट रचला.
यानंतर मायलेकींनी वेळ साधून प्रियकराची निर्घृण हत्या (Crime News) केली.
आरोपी मायलेकींनी मृतकावर आधी चाकूने सपासप वार करून त्याचं डोकं विटांनी ठेचलं आणि त्यानंतर मृत तरुणाचा मृतदेह नोएडाच्या एक्सटेंशन परिसरातील विसरख परिसरात फेकून दिला.

हि घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या घटनेचा कसून तपास केला असता पोलीस या आरोपी मायलेकींपर्यंत येऊन पोहोचले.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मायलेकींना अटक (Arrest) केली असता त्यांच्याकडून मृत तरुणाचं आधार कार्ड, पॅन कार्ड,
पासबुक आणि मोबाइलसह हत्या करण्यासाठी वापरेला चाकू आणि विट जप्त करण्यात आली.
तसेच पोलिसांनी घटनेच्या दिवशी आरोपी मायलेकींनी परिधान केलेले कपडेसुद्धा ताब्यात घेतले आहेत. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

 

Web Title : Crime News | boyfriend murdered by mother and daughter for sexual molestation in noida marathi news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी, जाणून घ्या आजचा 1 तोळ्याचा नवीन दर

Rakesh Jhunjhunwala | बाजारात प्रचंड घसरण, पण राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोचा शेयर 13% वधारला

Parambir Singh | परमबीर सिंहांच्या अडचणीत वाढ? गोपनीय फाईल चोरल्याप्रकरणी निकटवर्तीयावर FIR