Parambir Singh | परमबीर सिंहांच्या अडचणीत वाढ? गोपनीय फाईल चोरल्याप्रकरणी निकटवर्तीयावर FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चौकशीच्या फेऱ्यात आडकलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गृहमंत्रालयातील एक गोपनीय फाईल (Confidential file) चोरीला गेल्याचा संशय आहे. याप्रकरणी परमबीर सिंह (Parambir Singh) यांचे निकटवर्तीय संजय पूनामियांवर (Sanjay Punamiya) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. संजय पुनामिया यांच्या मोबाईलमध्ये ही फाईल आढळून आली आहे. परमबीर सिंह यांना गुन्ह्यात मदत करण्याच्या उद्देशाने ही फाईल चोरल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणामुळे परमबीर सिंह यांचे पाय आणखी खोलात गेले आहेत.

 

राज्यातील गृहविभाग आणि केंद्रीय तपास संस्थांमधील (Central Investigation Agency) गोपनीय पत्रव्यवहार खासगी व्यक्तीच्या कस्टडीत कसा गेला असा सवाल विचारला जात आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्या कारवाई संदर्भातील गृहविभागातील ही फाईल असल्याची माहिती समोर आली आहे. परमबीर सिंह यांचे निकटवर्तीय मानले जाणारे संजय पुनामिया आणि इतर आरोपींच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine Drive Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

संजय पुनामिया यांच्या मोबाईलमध्ये 27 पानांची फाईल सापडली आहे.
ही फाईल गोपनीय असल्याने कोणत्याही विभागाकडे किंवा माहितीच्या अधिकारात (RTI) दिली नसताना पूनामिया यांच्याकडे कशी आली?
संजय पूनामिया यांनी 27 पानांची फाईल त्यांचा मुलगा सनी पूनामिया (Sunny Punamiya) याला मोबाईलवरुन पाठवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
याबाबत एका वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.

 

Web Title :- Parambir Singh | parambir singhs problems escalated a case was filed against a close associate for stealing a confidential file

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 88 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 56 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या आकडेवारी

Thackeray Government | ठाकरे सरकारची मोठी घोषणा ! कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 50,000 रुपयांची भरपाई