धक्‍कादायक ! तुला शेवटचं भेटायचंय म्हणत ‘एक्स’ बॉयफ्रेन्डनं लग्‍नापुर्वी घेतला ‘तिचा’ जीव

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – तिच्या घरात लग्नाची जोरात तयारी सुरु असतानाच तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिचा जीव घेतला आणि आनंदाचे वातावरण असलेल्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. कोल्हापूर जवळील बेळगाव जिल्ह्यातील कसनाळ गावच्या एका कुटुंबियावर हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अमृता कुंभार या तरुणीची लग्नाच्या तीनच दिवसापूर्वी तिच्या एक्स बॉयफ्रेंडने हत्या केली. या प्रकरणी अमृताचा एक्स बॉयफ्रेंड योगेश चौगुलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील कसनाळ गावातील संतापजनक घटना आहे. अमृताचा येत्या ३ ऑगस्ट रोजी विवाह होणार होता. कुटुंबीयांनी इस्लामपूरमधल्या एका युवकाशी तिचं लग्न ठरवलं होतं.

शेवटचं भेटायचं सांगून केली हत्या

योगेश आणि अमृताचे ६ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. अमृताचे लग्न होणार आहे म्हणून योगेश व्यथित झाला होता. दोन दिवसांत अमृताच्या अंगाला हळद लागणार होती. त्या पूर्वीच योगेशने अमृताला मारायचे ठरवले. ‘तुला शेवटचं भेटायचं, असं सांगत योगेशनं लग्नाच्या तीन दिवसांपूर्वी अमृताला एका ठिकाणी बोलावून घेतलं. यानंतर बाइकवरून मानकापूर मार्गे जवळच्या शेतात नेलं. तिथे या दोघांमध्ये प्रचंड बाचाबाची झाली. यादरम्यान, योगेशनं तिच्या डोक्यात लोखंडी रॉडनं जबर मारहाण केली आणि तो फरार झाला.

शेतात आढळला अमृताचा मृतदेह

घराबाहेर जाऊन अमृताला बराच वेळ उलटून गेला होता. त्यामुळे कुटुंबीयांनी तिची शोधाशोध करण्यास सुरुवात केली. यादरम्यान, कुटुंबियांना अमृताचा मृतदेह आढळताच प्रचंड मोठा धक्का बसला. लाडक्या लेकीचा रक्तानं माखलेला मृतदेह त्यांना कसनाळच्या शेतात आढळून आला. या घटनेमुळे बेळगावसह कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जांभळी गावची अमृता कुंभार आणि सीमाभागातल्या बारवाड गावातील योगेश चौगुले या दोघांचं गेल्या सहा वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होतं. जांभळी गावात शिक्षण घेत असताना दोघांचंही प्रेम जुळले. दरम्यान, कर्नाटकमधल्या सदलगा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. योगेश चौगुलेला अटक देखील केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –