Crime News | धक्कादायक ! प्रियकराच्या लग्नात प्रेयसीनं केलं डायरेक्ट ‘हे’ कृत्य; धक्का सहन न झाल्याने नवरीच्या मामाचा मृत्यू

आग्रा : वृत्तसंस्था – Crime News | उत्तर प्रदेशातील (Utter Pradesh) आग्रा (Agra) येथील शाहगंजमध्ये मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली. आग्रा येथील शाहगंजमध्ये मंगळवारी रात्री एक विवाह सोहळा (Wedding ceremony) पार पडला. लग्नानंतर निघालेल्या वरातीत फतेहपूर सिक्रीहून आलेल्या एका तरुणीने आपण नवऱ्या मुलाची प्रेयसी असल्याचा दावा करत त्या ठिकाणी गोंधळ घातला. नवऱ्या मुलाने या तरुणीने केलेला दावा फेटाळताच तिने विष खाण्याचा प्रयत्न (Crime News) केला. तेव्हा उपस्थितांनी तिला रोखलं. हा गोंधळ पाहून नवरीच्या मामाला जबर धक्का बसला. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

 

शाहगंजमध्ये मंगळवारी रात्री फतेहपूर सिक्रीहून (Fatehpur Sikri) लग्नाची वरात आली. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. याचदरम्यान ताजगंजहुन (Tajganj) एक तरुणी त्या ठिकाणी आली आणि तिने नवऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याचा दावा केला. आम्ही दोघेही एकाच हॉटेलमध्ये काम करायचो. तिथेच दोघांची ओळख झाली. तरुणानं लग्नाचं वचन दिलं होतं आणि आता तो दुसऱ्या तरुणीशी लग्न करत असल्याचे या तरुणीने सांगितले. नवऱ्या मुलानं विश्वासघात (Crime News) केल्याचं म्हणत तिने गोंधळ घातला.

 

याची माहिती नवरीकडच्यांना समजली त्यामुळे अजून गोंधळ वाढला. हि तरुणी स्वत:सोबत पोलिसांनादेखील घेऊन आली होती. माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही, असं तरुणीनं नवऱ्या मुलाला विचारलं. त्यावर त्यानं नाही असं उत्तर दिलं. यानंतर तरुणीनं विष (Poision) खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तिला अडवले. रात्री 1 वाजेपर्यंत हा संपूर्ण प्रकार सुरू होता. लग्न सोहळा सुरू होण्यापूर्वी झालेला गोंधळ पाहून नवरीच्या मामाची प्रकृती बिघडली त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी दोन्हीबाजूंकडून सल्लामसलत करून हे प्रकरण मिटवण्यात आले.

 

Web Title :- Crime News | former girlfriend consumed poison boyfriend wedding UP agra aunty died

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा