चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
पुण्यातील नऱ्हे आंबेगाव येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. कोमल राहुल हंडाळ असे मयत महिलेचे नाव आहे.आरोपी पती राहुल राजेश हंडाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंहगड रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे आंबेगाव येथे राहुल आणि कोमल हे राहत होते. त्यांचा प्रेम विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. सिंहगड रस्ता पोलीस स्टेशन हददीत अंकुश पॅलेस, कुटे मळा, मानाजी नगर नऱ्हे, पुणे या ठिकाणी महिला कोमल राहुल हंडाळ, (वय : 22) हिचा तिचा पती राहुल राजेश हंडाळ, (वय:23) याने खून केला आहे. आरोपी याने खून केल्यानंतर मयत कोमलचे सर्व नातेवाइकांना मेसेज तसेच फोन करून माहिती दिली की, त्याने कोमलला फाशी देऊन खून केला आहे, घटनास्थळी छताला नायलॉनची तुटलेली दोरी आहे. तसेच मयत कोमलच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत आहे, मृत कोमलच्या गळ्यावर तीन सेंटीमीटर खूण आहे, खून केल्यानंतर आरोपीने मयत कोमलला लिपस्टिक लाऊन नवी साडी नेसवून मंगळसुत्र गळ्यात घातले होते. पती आरोपी हा रेकॉडवरील गुन्हेगार असून व्यसनी आहे.

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या