Crime News | दाम्पत्याने असे काही केले की 2 वर्षाची मुलगी झाली अनाथ

0
71
Jaipur Crime jaipur notorious thief gang worked on salary got target incentive like corporate company nabbed crime news
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Crime News | एक हसतं – खेळतं घर उद्ध्वस्त झाल्याचं समोर आलं आहे. एका दाम्पत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide News) केली असून दोन वर्षांची लेक पोरकी झाली आहे. ही हृदयद्रावक घटना हरियाणाच्या सोनीपत मध्ये घडली आहे. दाम्पत्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. (Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोनीपतमधील कुंडली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवपुरी कॉलनी आहे. तेथे ३० वर्षीय अमन आणि त्याची पत्नी पलेन्द्री देवी भाड्याच्या घरात राहतात. त्यांना दोन वर्षाची मुलगी आहे अमन प्लंबरचं काम करतो. दरम्यान शेजारी राहणाऱ्या लोकांनी दाम्पत्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. (Crime News)

 

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी दाम्पत्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली आहे. तपास अधिकारी रणबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, दाम्पत्याने आत्महत्या केल्याचा फोन पोलिसांना आला होता. घटनास्थळी पोलीस पोहोचले. तेव्हा त्यांना पती पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसले. त्यांना दोन वर्षाची मुलगी देखील असल्याचे समोर आले. दरम्यान या आत्महत्ये मागील कारण समजू शकले नाही. मात्र या प्रकरणी पोलिसांनी काही जणांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. शवविच्छेदनसाठी मृतदेह पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title :- Crime News | sonipat husband wife died suspicious circumstances

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा