Crime News | नगर परिषदेचा निलंबित अधिकारी निघाला ‘कुबेर’; 3 फ्लॅट, महागड्या गाड्या, 12 तास सुरु होता छापा

पाटणा : पोलीसनामा ऑनलाइन  – Crime News | बिहारमध्ये जादा पैसे कमावणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांविरोधात सुरू असलेली कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. विशेष दक्षता पथकानं बुधवारी हाजीपूर नगर परिषदेचे माजी मुख्य कार्यपालन अधिकारी अनुभूती श्रीवास्तव यांच्या पाटण्यातील फ्लॅटवर छापा टाकला. या छाप्यात अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बारा तासाहून अधिक काळ सुरु असलेल्या कारवाईदरम्यान या निलंबित अधिकाऱ्याकडे मोठ्या प्रमाणात अवैध संपत्ती असल्याचे समोर आले त्याचबरोबर आलिशान गाड्याही त्याच्याकडे (Crime News) आहेत.

विशेष दक्षता पथकानं अनुभूती श्रीवास्तव यांच्या पाटण्यातील रुकनपुरा येथील अपार्टमेंटमध्ये असलेल्या फ्लॅटवर धाड टाकली.
या व्यतिरिक्त श्रीवास्तव यांच्याकडे पाटण्यातच आणखी एक फ्लॅट असून दुसरा इंदूरमध्ये आहे.
दोन्ही फ्लॅटशी संबंधित कागदपत्रं हस्तगत करण्यात आली आहेत.
याशिवाय श्रीवास्तव यांनी त्यांची पत्नी आणि मुलाच्या नावावर विमा आणि म्युच्युअल फंड्सदेखील खरेदी केले होते.
त्यासाठी ते दरवर्षी १५ लाखांहून अधिकचा प्रीमियम भरायचे अशी माहितीही समोर आली आहे.
श्रीवास्तव यांनी अनेकदा परदेश प्रवास केला असून त्यावर मोठा खर्च झाल्याचे समोर आले असून त्याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम सुरु आहे.

पथकाने त्यांच्याकडे असणाऱ्या इनोव्हा, अर्टिगासारख्या महागड्या गाड्यादेखील जप्त केल्या आहेत.
यावेळी काही आक्षेपाहार्य कागदपत्रे आढळून आली असून तीही ताब्यात घेण्यात आली आहे.
एवढंच नाही तर श्रीवास्तव यांनी फिक्स डिपॉझिट, एलआयसी, रियल इस्टेटसह अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे.
पथकाने त्यांच्या घरातून मोठी रक्कम जप्त केली आहे.
मात्र त्याचा आकडा अदयाप जाहीर केला गेला नाही.
सरकारकडे श्रीवास्तव यांच्या बहुतांश संपत्तीची माहिती नाही.

 

Web Title : Crime News | special vigilance team seized documents illegal property and cash during raid government officer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | चुलत भावाचा फोटो ‘डीपी’ला ठेवून तरुणाला 4 लाखांचा ‘गंडा’

Pune MNS | ‘उघड दार उद्धवा आता…’, भाजपनंतर मनसेचं पुण्यात खुली करण्यासाठी आंदोलन (व्हिडिओ)

Actor Siddharth Shukla | अभिनेता आणि Bigg Boss चा विजेता सिध्दार्थ शुक्लाचं 40 व्या वर्षी हार्ट अटॅकमुळं मुंबईत निधन