CRPF Recruitment 2020 : सीआरपीएफकडून 800 कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, इन्स्पेक्टर आणि SI पदांच्या भरतीसाठी ‘नोटिफिकेशन’ जारी,जाणून घ्या प्रकिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – CRPF Recruitment 2020 : केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाने ऑफिशियल वेबसाइटवर सीआरपीएफ रिक्रुटमेंट 2020 नोटिफिकेशन जारी केले आहे. केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल (सीआरपीएफ ) ग्रुप ‘बी‘ आणि ‘सी‘ पदांवर भरती प्रक्रिया सुरू करत आहे, योग्य आणि इच्छुक उमेदवार ऑफलाइन मोडच्या माध्यमातून सीआरपीएफ रिक्रुटमेंट 2020 साठी अर्ज करू शकतात. उमेदवार आपला अर्ज 20 जुलैपासून 31 ऑगस्ट 2020च्या दरम्यान करू शकतात. पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराला हे पाहावे लागेल की, तो सर्व शैक्षणिक पात्रता, वय, शारीरीक मापदंड इत्यादी पूर्ण करत आहे आणि पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहे.

* सीआरपीएफ रिक्रुटमेंट 2020 – महत्वपूर्ण तारखा

अर्जासाठी सुरूवातीची तारीख – 20 जुलै 2020
अर्ज करण्याची अंतिम तारीख –31 ऑगस्ट 2020
लेखी परीक्षेची तारीख – 20 डिसेंबर 2020

* सीआरपीएफ रिक्रुटमेंट 2020 – रिक्त पदे :

1 इन्स्पेक्टर (डायटीशियन) – 01
2 सब इन्स्पेक्टर (स्टाफ नर्स) – 175
3 सब इन्स्पेक्टर (रेडियोग्राफर) – 08
4 असिस्टंट सब-इन्स्पेक्टर (फार्मासिस्ट) – 84
5 असिस्टंट सब-इन्स्पेक्टर (फिजियोथेरेपिस्ट) – 05
6 असिस्टंट सब-इन्स्पेक्टर (डेंटल टेक्निशियन) – 04
7 असिस्टंट सब-इन्स्पेक्टर (लेबोरेटरी टेक्निशियन) – 64
8 असिस्टंट सब-इन्स्पेक्टर / इलेक्ट्रो-कार्डियोग्राफी टेक्निशियन – 01
9 हेड कॉन्स्टेबल (फिजियोथेरेपी असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट / मेडिकल) – 99
10 हेड कॉन्स्टेबल (एएनएम / मिडवाइफ) – 3
11 हेड कॉन्स्टेबल (डायलिसिस टेक्निशियन) – 8
12 हेड कॉन्स्टेबल (जूनियर एक्सरे असिस्टंट) – 84
13 हेड कॉन्स्टेबल (लेबोरेटरी असिस्टंट) – 5
14 हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रीशियन) – 1
15 हेड कॉन्स्टेबल (स्टीवर्ड) – 3
16 कॉन्स्टेबल (मसालची) – 4
17 कॉन्स्टेबल (कुक) – 116
18 कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) – 121
19 कॉन्स्टेबल (धोबी / वॉशरमन) – 5
20 कॉन्स्टेबल (डब्ल्यू / सी) – 3
21 कॉन्स्टेबल (टेबल बॉय) – 1
22 हेड कॉन्स्टेबल (वेटनरी) – 3
23 हेड कॉन्स्टेबल (लॅब टेक्निशियन) – 1
24 हेड कॉन्स्टेबल (रेडियोग्राफर) – 1

* सीआरपीएफ रिक्रुटमेंट 2020 – कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, इन्स्पेक्टर, एएसआय आणि एसआय पदासाठी पात्रता

शैक्षणिक पात्रता :

इन्स्पेक्टर (डायटिशियन) – होम सायन्स / होम इकॉनॉमिक्स विषयासह बीएससी किंवा केंद्रीय विद्यापीठ / राज्य सरकारच्या मान्यता प्राप्त विद्यापीठातून समकक्ष आणि कोणत्याही संस्थेतून डायटेटिक्सचा डिप्लोमा जो राज्य सरकारद्वारे मान्यता प्राप्त आहे, किंवा होम सायन्समध्ये मास्टर डिग्री (फूड) असावा.

सब इन्स्पेक्टर (स्टाफ नर्स) – कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून 12वी पास आणि मान्यता प्राप्त बोर्ड आणि विद्यापीठातून जनरल नर्सिंग आणि मिडवायफरीमध्ये साडेतीन वर्षाचा कोर्स डिप्लोमा कोर्स पास केलेला असावा. उमेदवार केंद्रीय नर्स परिषद किंवा राज्य नर्सिंग परिषदसोबत नर्स किंवा मिडवायफरी म्हणून नोंदणीकृत असावा.

* सीआरपीएफ रिक्रुटमेंट 2020 – वय मर्यादा :

1 सब-इन्स्पेक्टर – 30 वर्ष
2 असिस्टंट सब-इन्स्पेक्टर – 20 ते 25 वर्ष
3 हेड कॉन्स्टेबल – 18 ते 25 वर्ष
4 हेड कॉन्स्टेबल (जूनियर एक्सरे असिस्टंट / लेबोरेटरी असिस्टंट / इलेक्ट्रीशियन) – 20 ते 25 वर्ष
5 हेड कॉन्स्टेबल (स्टीवर्ड) आणि कॉन्स्टेबल -18 ते 23 वर्ष

* सीआरपीएफ रिक्रुटमेंट 2020 – कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, इन्स्पेक्टर, एएसआय आणि एसआय पदांसाठी निवड प्रक्रिया :

निवड फिजिकल स्टँडर्ड टेस्ट (एफएसटी), फिजिकल एलिजिबिलिटी टेस्ट (एफईटी), लेखी परीक्षा, ट्रेड टेस्ट / कागदपत्रांचे स्क्रीनिंग आणि मेडिकल परीक्षेच्या आधारावर निवड केली जाईल.

* सीआरपीएफ रिक्रुटमेंट 2020 – कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, इन्स्पेक्टर, एएसआय आणि एसआय पदांची भरती 2020 साठी अर्ज असा करा

योग्य उमेदवारांनी 20 जुलैपासून सर्व संबंधित कागदपत्रांच्या फोटोकॉपीसोबत आपला अर्ज ‘डीआयजीपी, ग्रुप सेंटर, सीआरपीएफ , भोपाळ, व्हिलेज- बंगरसिया, तालुका – हुजूर, डिस्ट्रिक्ट- भोपाळ, मध्य प्रदेश-462045 या पत्त्यावर 31 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज पाठवावा.

* सीआरपीएफ रिक्रुटमेंट 2020 – अर्ज शुल्क :

ग्रुप- बी – 200 / – रूपये
ग्रुप- सी – 100 / – रूपये.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like