तुमच्या शहरात ‘या’ कारणामुळं 2 रूपये प्रति लिटर स्वस्त होऊ शकतं पेट्रोल-डिझेल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना साथीच्या संकटाच्या दरम्यान महागाई देखील सर्वसामान्यांना सतत त्रास देत आहे. पण येत्या 2-3 महिन्यांत यामधून त्यांना आराम मिळू शकणार आहे कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर, गेल्या एका आठवड्यात कच्च्या तेलाच्या किंमतीत 8 टक्क्यांनी घट झाली आहे. अशा परिस्थितीत पेट्रोल डिझेलच्या किंमती घसरल्याचा अंदाज तज्ञ लावत आहेत. एसकोर्ट सिक्युरिटीचे रिसर्च आसिफ इकबाल यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, कच्चे तेल स्वस्त झाल्यामुळे ऑइल मार्केटिंग कंपन्यांना दिलासा मिळणार आहे. कारण परदेशात आपल्या गरजेनुसार भारत 82 टक्के कच्चे तेल खरेदी करते. गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोलचे दर निरंतर वाढत आहेत किंवा स्थिर आहेत. तेल कंपन्यांवर किंमती कमी करण्याचा दबाव आहे. त्यामुळे आता ब्रेंट क्रूडच्या किंमती घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळू शकेल. सध्याच्या पातळीवरून क्रूडमध्ये 20 टक्के कपात केल्यास पेट्रोल आणि डिझेलमध्ये 5 टक्क्यांची कपात केली जाऊ शकते. तर पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर अडीच ते तीन रुपयांनी स्वस्त होऊ शकते.

3 रुपयांनी स्वस्त झाले पेट्रोल-डिजेल
दिल्लीबद्दल बोलायचे म्हणले तर, 10 सप्टेंबरनंतर ते प्रति लिटर 1.19 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्याचबरोबर डिझेल प्रति लिटर 3.10 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

कच्च्या तेलाचे दर 6 टक्क्यांनी घसरले
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी मिळाल्यापासून कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी घट झाली आहे. तसेच कच्च्या तेलाची मागणी सातत्याने कमी होत आहे. म्हणूनच क्रूडच्या किंमतीवर दबाव आहे. कारण जिथे कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत आहे. तेथे, व्यवसाय क्रियाकलापाचा वेग कमी होत आहे. म्हणूनच मागणी कमी होत आहे. या कारणास्तव, बर्‍याच कंपन्यांनी त्यांचे उत्पादन खपावे म्हणून सूट देण्यास सुरूवात केली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा क्रूडमधील मोठी घसरण नाकारता येऊ शकत नाही. ऑक्टोबरपर्यंत ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल 32 डॉलरवर घसरण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्याच्या तुलनेत पेट्रोल विक्रीमध्ये 10.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तथापि, डिझेलची मागणी नकारात्मक राहिली आहे. वार्षिक आधारावर डिझेल विक्रीत सात टक्क्यांनी घट झाली आहे. ऑगस्टच्या तुलनेत डिझेलची विक्री 22 टक्क्यांनी वाढली आहे. 25 मार्चच्या लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच जगातील तिसर्‍या क्रमांकाच्या आयात करणार्‍या देशात पेट्रोलची विक्री वाढली आहे. सप्टेंबरमध्ये पेट्रोलची विक्री 22 लाख टनांपर्यंत वाढली. गेल्या वर्षी याच महिन्यात ते 21.6 लाख टन होते. ऑगस्ट 2020 मध्ये पेट्रोलची विक्री 1.9 दशलक्ष टन होती.

सप्टेंबरमध्ये देशात सर्वाधिक वापरण्यात येणारे इंधन डिझेलची विक्री घटून ती 48.4 लाख टनांवर गेली. सप्टेंबर 2019 मध्ये ते 52 लाख टन होते. त्याच वेळी ऑगस्ट 2020 मध्ये डिझेलची विक्री 39.7 लाख टन होती.