क्रीडा

सुरेश रैनाचं भवितव्य ठरलंय, CSK चा ‘हा’ मोठा निर्णय !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : आयपीएलच्या 14व्या पर्वापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने काही टफ कॉल घेतलेत. यूएईत झालेल्या इंडियन प्रीमिअर लीग 2020तील निराशाजनक कामगिरीनंतर संघामध्ये बरेच बदल अपेक्षित होते आणि त्या दृष्टीने फ्रँचायझीनं मोठे निर्णय घेतलेत. हरभजन सिंग याला रिलीज केल्यानंतर सीएसके संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाला कायम ठेवणार का?, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. त्यांची हि प्रतीक्षा संपली असून महेंद्रसिंग धोनीच्या संघाने इंडियन प्रीमिअर लीग 2021 साठी बुधवारी निर्णय घेतलेत.

इंडियन प्रीमिअर लीग 2021साठी प्रत्येक फ्रँचायझी संघामध्ये बदल करणार आहेत. त्यासाठी हे मिनी ऑक्शन घेतली जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या खात्यामध्ये सर्वात कमी 15 लाख रुपये शिल्लक आहेत. आपल्या खात्यातील रक्कम वाढवण्यासाठी चेन्नई केदार जाधव, पियुष चावला या दोन खेळाडूंना रिलिज करण्याची शक्यता वर्तविली जात होती. ही शक्यता खरी ठरली आहे. केदार जाधव, पियूष आणि मुरली विजय यांना रिलीज केले जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे. या बाबतचा निर्णय संध्याकाळपर्यंत जाहीर करण्यात येईल. ड्वेन ब्राव्हो व फॅफ ड्यू प्लेसिस यांना संघाने कायम ठेवलंय, तर शेन वॉटसननं निवृत्ती घेतलीय.

इंडियन प्रीमिअर लीग 2020त सुरुवातीला अनेक नाट्यमय बाबी घडल्यात. यूएईत दाखल झाल्यानंतर चेन्नईचे खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आढळलेत. त्यानंतर सुरेश रैनानं मायदेशी परतण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्या या निर्णयानंतर बरीच चर्चा रंगलीय. धोनी आणि त्याच्यात हॉटेल रुमवरून वाद झाल्याचे सांगण्यात आलंय, परंतु त्यात तथ्य नव्हते. रैनाच्या आत्या आणि काकांच्या घरी दरोडेखोरांनी हल्ला केला आणि त्यात काका व त्यांच्या मुलाचा मृत्यू झालाय. त्यामुळे रैना मायदेशात परतला आहे. त्यानंतर रैनाचा ’सीएसके’ सोबतचा प्रवास संपला, असे वृत्त आले आहे. पण, चेन्नईने त्याला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलंय.

रैनाने चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएलमध्ये सर्वाधिक 4527 धावा केल्यात. रैनाने मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. रैनाने 18 कसोटी, 226 वन डे आणि 78 ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलंय. त्याने कसोटीमध्ये 768 धावा आणि 13 विकेट्स घेतल्यात. वन डे’मध्ये त्याच्या नावावर 5615 धावा आणि 36 विकेट्स, तर ट्वेंटी-20मध्ये त्यानं 1605 धावा व 13 विकेट्स घेतल्यात. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20मध्ये शतक करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे.

’सुरेश रैना हा संघातील महत्त्वाचा सदस्य असून तो संघाचा अविभाज्य घटक आहे. त्याला करारमुक्त करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यूएईतून माघारी परतण्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय होता व संघ व्यवस्थापनाला त्याच्या निर्णयाचा आदर आहे. केदार जाधव, पियूष आणि मुरली विजय यांच्याबाबतचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत जाहीर केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले आहे.

Back to top button