Curd | मातीच्या भांड्यात दही लावण्याचे ४ आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या, कधीही वापरणार नाही स्टीलचे भांडे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – दह्याची (Curd) चव सर्वांनाच आवडते, म्हणूनच प्रत्येक जेवणासोबत ते खायला आवडते आणि विविध पाककृतींमध्ये त्याचा समावेश केला जातो. दह्याचे अनेक फायदे आहेत, ते पोट थंड ठेवते आणि पचनाशी संबंधित समस्या टाळते. यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असल्याने हाडे आणि दात मजबूत होतात. पण तुम्ही दही मातीच्या भांड्यात लावता की स्टीलच्या भांड्यात हे महत्त्वाचे आहे (Making Curd In Earthen Pot).

 

मातीच्या भांड्यात दही लावण्याचे फायदे
जुन्या काळी प्रत्येक घरात मातीच्या भांड्यात दही लावले जात असे, पण बदलत्या काळात त्याची जागा स्टीलच्या भांड्यांनी घेतली. आजकाल बरेच लोक घरीही दही बनवण्याची तसदी घेत नाहीत, उलट ते बाजारातून विकत घेतात. मातीच्या भांड्यात दही लावल्यास कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.

 

१. दही लवकर लागते
उन्हाळ्यात, दही सहज आणि खूप लवकर लागते, परंतु हिवाळ्यात ते उशिरा होते कारण त्याला विशेष तापमान आवश्यक असते. जर तुम्ही मातीच्या भांड्यात दही लावले तर ते दह्याला इन्सुलेट करते आणि हिवाळ्यातही ते लवकर लागते.

२. दही घट्ट लागते
मातीच्या भांड्यात दही (Curd) ठेवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे दही घट्ट होते, कारण मातीचे भांडे पाणी शोषून घेते, त्यामुळे दही घट्ट होते. याउलट, जर तुम्ही स्टील किंवा अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात दही ठेवले तर असे होत नाही.

 

३. नॅचरल मिनरल्स मिळतात
जर तुम्ही स्टील किंवा अ‍ॅल्युमिनियमऐवजी मातीच्या भांड्यात दही लावले तर शरीरासाठी नॅचरल मिनरल्स मिळतात,
ज्यामध्ये लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांचा समावेश होतो.

 

४. मातीचा फ्लेवर मिळेल
तुम्ही अनेकदा हे पाहिले असेल की, जेव्हा दही मातीच्या भांड्यात लावले जाते
तेव्हा त्याला मातीसारखा सुगंध येऊ लागतो, त्यामुळे दह्याची चव आणखी छान लागते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Curd | why making curd in earthen clay pot is better than steel or aluminum bowl know the reason

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पत्नीच्या प्रियकराचा पतीवर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; संगमवाडी गावठाणातील घटना

Bigg Boss Marathi Season 4 | बिग बॉस मराठीच्या घरात अभिनेता रितेश देशमुखने केले असे काही स्पर्धक झाले थक्क

Tunisha Sharma Death Case | तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर