Tunisha Sharma Death Case | तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

पोलीसनामा ऑनलाईन : Tunisha Sharma Death Case | दोन दिवसांपूर्वी TV अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने कार्यक्रमाच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी तुनिषा शर्माचा कथित बॉयफ्रेंड शिझान मोहम्मद खान याला पोलिसांनी अटक करून 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. (Tunisha Sharma Death Case)

तुनिषा शर्माचा कथित बॉयफ्रेंड शिझान हा तिला डेट करत असताना इतर मुलींच्याही संपर्कात होता. तो तुनिषाशी कमिटेड नव्हता त्यामुळे तुनिषा तणावात राहायची. आत्महत्या करण्याच्या 15 दिवसापूर्वीच शिझान आणि तुनिषा यांचे ब्रेकअप झाले होते. त्यामुळे तुनिषा पुन्हा एकदा डिप्रेशनमध्ये गेली होती. शिझानबरोबर झालेल्या ब्रेकअपचा तिला मोठा धक्का बसला होता. तसेच 10 दिवसांपूर्वीच तुनिषाला एंग्जायटी अ‍ॅटॅक आला होता अशी माहिती तुनिषा शर्माच्या काकांनी दिली आहे.

16 डिसेंबरला तुनिषाला शिझान इतर मुलींशी संपर्क ठेवून आपली फसवणूक करत असल्याचं समजल्यानंतर ती
खूप पॅनिक झाली होती आणि त्याचवेळी तिला एंग्जायटी अ‍ॅटॅक आल्याची माहिती तिच्या काकांनी दिली आहे.
“शिझान आपल्याला दुसरं कोणीतरी आवडत असून तिच्याशी नात्यात असल्याने आपण तुझ्याबरोबर ब्रेकअप
करत असल्याचे म्हणाला होता. या गोष्टीमुळे तिला धक्का बसला आणि ती डिप्रेशनमध्ये गेली.
याच डिप्रेशनमुळे तुनिषाला हा एंग्जायटी अ‍ॅटॅक आला होता अशी माहिती तुनिषाचे काका पवन शर्मा यांनी दिली आहे.

Web Title :- Tunisha Sharma Death Case | tunisha sharma death case before suicide actress got anxiety attack

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पत्नीच्या प्रियकराचा पतीवर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; संगमवाडी गावठाणातील घटना

Bigg Boss Marathi Season 4 | बिग बॉस मराठीच्या घरात अभिनेता रितेश देशमुखने केले असे काही स्पर्धक झाले थक्क