Custom Officials Seize Gold At Pune Airport | गुप्तांगात कॅप्सूल लपवून सोन्याची तस्करी, पुणे विमानतळावर 33 लाखांचे सोने जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Custom Officials Seize Gold At Pune Airport | सोन्याची भुकटी असलेली कॅप्सुल गुप्तांगात लपवून तस्करी करण्याचा प्रकार केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) उघडकीस आणला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोघांना कस्टमच्या अधिकाऱ्यांना पकडले असून, त्यांच्याकडून 33 लाख 33 हजार रुपयांची 555 ग्रॅम सोन्याची भुकटी जप्त केली आहे. या पूर्वीही अशा प्रकारच्या तस्करीचा पर्दाफाश सीमा शुल्क विभागाने केला आहे. (Custom Officials Seize Gold At Pune Airport)

पुण्यातील लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून दोघे जण आले. यावेळी त्यांची हालचाल संशयास्पद आढळून आली. ते घाई घाई ने विमानतळाच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. ही बाब विमानतळावरील कस्टमच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.

कस्टमच्या अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता, त्यांनी गुप्तांगात सोन्याची भुकटी असलेल्या कॅप्सुल लपवल्याचे आढळून आले. कॅप्सुलमध्ये तब्बल 555 ग्रॅम सोन्याची भुकटी त्यांनी तस्करी करुन पुण्यात आणली होती. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी ही सोन्याची भुकटी जप्त केली आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत 33 लाख 33 हजार रुपये असल्याची माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिली. (Pune Crime News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लोहगाव: अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; छेडछाड करणार्‍याला अटक

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पेट्रोल पंपावर 20 लाखांची फसवणूक

भीक मागण्यासाठी चक्क आपल्याच मुलीला विकले; देववाले समाजातील पंचासह १५ जणांवर गुन्हा दाखल

पर्वती पोलिसांकडून सराईत गुन्हेगाराला पिस्तुलासह अटक