Pune Crime News | भीक मागण्यासाठी चक्क आपल्याच मुलीला विकले; देववाले समाजातील पंचासह १५ जणांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- Pune Crime News | भीक मागण्यासाठी आपल्याच चार वर्षाच्या मुलीला तिच्या आईवडिलांनी २ हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिचा ताबा असलेल्या एका दाम्पत्याला अटक केली आहे. मरीआई देववाले समाजातील १० पंचासह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या समाजातील काही तरुणांनी या व्यवहाराला विरोध दर्शविला. परंतु, पंचांनी त्यांना कोणी विरोध केला व पोलिसांकडे गेला तर जातीबाहेर काढू, असा जात पंचायतीने निर्णय दिला. या सर्व पंचायत सदस्यांची दहशत असल्याने व ते व्याजाने पैसे देत असल्याने घाबरुन सर्व जण बसले आहेत. (Pune Crime News)

याबाबत अ‍ॅड शुभम शंकर लोखंडे (वय २६, रा. वैदुवाडी, हडपसर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वकिल असून त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने त्याची माहिती दिली. एक महिला गेल्या २ महिन्यांपासून कल्याणीनगर, विमाननगर या भागात ४ ते ५ वर्षाच्या मुलीला घेऊन भीक मागत असताना दिसून येते. भीक मिळाली नाही तर तिला मारहाण (Beating) करते. त्यांनी अधिक माहिती घेतली असता अहमदनगरमधील एका दाम्पत्याला ६ मुली आहेत. त्यांच्याकडून या तिघांनी समाजातील पंचाच्या सहमतीने २ हजार रुपयांना विकत घेतली. त्यासाठी जात पंचायतीने पैसे घेतल्याची माहिती मिळाली. समाजातील चौघा जणांनी त्या मुलीला विकत घेऊ नये, यासाठी विरोध केला. परंतु, समाजातील १० पंचांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. त्याला मान्यता दिली. विरोध करणार्‍र्याना जातीचे बाहेर काढून असा जात पंचायतीने निर्णय दिला. त्यानंतर फिर्यादी यांना ही बाब समजल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन माहिती दिली. पोलिसांनी ही मुलगी ताब्यात असलेल्या दोघांना अटक केली आहे. (Pune Crime News)

दरम्यान, आपण या मुलीला दत्तक घेतल्याचा दावा या मुलीचा ताबा असलेल्या दाम्पत्याने केला आहे. पोलीस उपनिरीक्षक नांगरे (PSI Nangare) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap Case | ठेकेदाराकडून लाच घेताना राजगुरु नगरपरिषदेतील मुख्याधिकारी, महिला अभियंता, लेखापाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ

Chandrashekhar Bawankule On Lok Sabha Elections | 48 मुस्लिम नेते सांभाळणार लोकसभा प्रचाराची जबाबदारी; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

Pune News | आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची रिपब्लिकन जनशक्तीची मागणी

Modi Govt On Ujjwala Yojana | एलपीजी गॅस संदर्भात खुशखबर! केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेतून 75 लाख मोफत गॅस कनेक्शन