Pune Crime News | पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पेट्रोल पंपावर 20 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | पोलिसांसाठी कल्याण योजना राबविता याव्यात, यासाठी ग्रामीण पोलीस दलाने (Pune Rural Police Force) पाषाण येथे दोन पेट्रोल पंप (Petrol Pump) सुरु केले. तेथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी त्यांच्याकडे जमा झालेले पैसे न भरता तब्बल २० लाख १९ हजार ६१ रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Pune Police) पेट्रोल पंपावर काम केलेल्या तब्बल ५६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत ग्रामीण पोलीस दलाच्या मुख्यालयातील पोलीस कल्याण शाखेचे (Police Welfare Branch) राजेश घायाळ यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६४७/२३) दिली आहे. त्यानुसार विमला जेम्य, सुनिता ननावरे, सुरज पाथरे, रेवती पाटील, अक्षय जगताप, आनंता चांदणे व इतर ५० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून २०२१ ते मार्च २०२३ दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलीस दलाचे कल्याण शाखेअंतर्गत पाषाण रोड व बाणेर रोड येथे दोन पेट्रोल पंप उभारण्यात आले आहेत. येथे खासगी कंपनीमार्फत कर्मचारी भरले जातात. या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणार्‍या कर्मचारी यांच्याकडे ग्राहक पेट्रोल भरल्यानंतर रोखीने पैसे जमा करत. त्यापैकी काही रक्कम हे कर्मचारी जमा करीत नसत. या पेट्रोल पंपाचे लेखापरिक्षण करण्यात आले. त्यात लेखा परिक्षक शेख भगरे यांनी अहवाल दिला. त्यात बाणेर रोडवरील पेट्रोल पंपावर १० लाख २५ हजार ३२४ रुपये तसेच पाषाण रोड पेट्रोल पंपावर २ लाख ९३ हजार ७३६ रुपये असा एकूण २० लाख १९ हजार ६१ रुपयांचा अपहार करुन फसवणूक (Fraud Case) केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी या कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap Case | ठेकेदाराकडून लाच घेताना राजगुरु नगरपरिषदेतील मुख्याधिकारी, महिला अभियंता, लेखापाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ

Chandrashekhar Bawankule On Lok Sabha Elections | 48 मुस्लिम नेते सांभाळणार लोकसभा प्रचाराची जबाबदारी; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

Pune News | आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची रिपब्लिकन जनशक्तीची मागणी

Modi Govt On Ujjwala Yojana | एलपीजी गॅस संदर्भात खुशखबर! केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेतून 75 लाख मोफत गॅस कनेक्शन