Cyclone Biporjoy Update | बिपरजॉय चक्रीवादळामुळे 67 रेल्वे गाड्या रद्द; रेल्वे मंत्रालयाचा निर्णय

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – Cyclone Biporjoy Update | गेल्या काही दिवसापासून बिपरजॉय चक्रीवादळाची (Cyclone Biporjoy Update) जोरदार चर्चा सुरू आहे. बिपरजॉय चक्रीवादळ अरबी समुद्रात (Arabian Sea) धडकले आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकले आहे. भारतीय हवामान विभागाच्या (Indian Meteorological Department-IMD) म्हणण्यानुसार, हे चक्रीवादळ 15 जून रोजी ताशी 125 ते 135 किमी वेगाने गुजरात (Gujarat) आणि पाकिस्तानातील (Pakistan) कराचीमध्ये (Karachi) धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता रेल्वे मंत्रालयाकडून (Ministry of Railways) मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वे विभागाने 67 रेल्वे रद्द (67 Trains Cancelled) केल्या आहेत. तसेच, रेल्वे मंत्रालयाने वॉर रूमची (War Room) स्थापना केली आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार लाहोटी (CEO Anil Kumar Lahoti) आणि बोर्डाचे इतर सदस्य परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. दि.13 जून ते दि.15 जून या दरम्यान 95 गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे. तर 67 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चक्रीवादळाच्या (Cyclone Biporjoy Update) प्रभाव दरम्यान, स्थानकांवरील खाद्यपदार्थांचे स्टॉल पुरेशा साठ्यासह उघडे राहतील जेणेकरून अडकलेल्या प्रवाशांना त्रास होणार नाही. प्रवाशांना रस्त्याने नेण्यासाठी राज्य सरकारच्या बसेस (State Government Buses) आणि रुग्णवाहिकांची (Ambulance) देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

चक्रीवादळामुळे 14 जून आणि 15 जून दरम्यान गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर राजकोट, जुनागड आणि मोरबी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. चक्रीवादळामुळे हे सर्व जिल्हे प्रभावित होणार आहेत. बिपरजॉय चक्रीवादळाचा मोठा फटका गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ परिसरांना बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. या भागामध्ये पश्चिम रेल्वेचे भावनगर, राजकोट आणि अहमदाबाद विभाग येतात. दरम्यान, मुंबई किनारपट्टी (Mumbai Coast) भागात बुधवारीही वाऱ्यांचा वेग ताशी 40-50 किलोमीटर दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा  

https://twitter.com/ANI/status/1668276095584698368?

दरम्यान, चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकले असून ते अरबी समुद्र ओलांडल्याचे दिसत आहे. त्यामुळे गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्र साठी चक्रीवादळाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात मधील खाऊ बंदर ओलांडण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी यांची मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा –
गुजरात राज्याला चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी
(Gujrat CM Bhupendra Patel) दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी बिपरजॉय चक्रीवादळासंदर्भातील
पूर्वतयारीची माहिती घेतली. आपत्तीच्या काळात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन केंद्र सरकारने
(Central Government) दिले आहे.

Web Title :   Cyclone Biporjoy Update | 67 trains have been cancelled in view of cyclone biporjoy says cpro western railway

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap News | येरवडा पोलिस ठाण्यातील ‘खाबुगिरी’ चव्हाट्यावर ! मध्यरात्री लाचखोर हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 3 पोलिसांविरूध्द गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ

Petrol-Diesel Price Today | प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर काय? 1 लिटरसाठी द्यावे लागतील इतके रुपये; जाणून घ्या

Pune Gold Rate Today | पुणेकरांसाठी खुशखबर! सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

Pune Marketyard Fir News | मार्केटयार्ड परिसरात भीषण आग; 2 कामगारांचा होरपळून मृत्यू, एकजण गंभीर जखमी