Pune Marketyard Fir News | मार्केटयार्ड परिसरात भीषण आग; 2 कामगारांचा होरपळून मृत्यू, एकजण गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Marketyard Fir News | पुण्यातील मार्केटयार्ड येथील हॉटेल रेवळ सिद्धी (Hotel Rewal Siddhi Market Yard) येथे आग (Pune Fire News) लागल्याची घटना घडली. या आगीत दोन कामगारांचा होरपळून जागीच मृत्यू (Died) झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी (Injured) आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना (Pune Marketyard Fir News) मध्यरात्री एक वाजण्याच्या आसपास घडली असल्याचे सांगण्यात येते. (Two Workers Died, One Injured)

 

याबाबत माहिती अशी, की मार्केटयार्ड येथील गेट नंबर एक जवळ असलेल्या हॉटेल रेवळ सिद्धी येथे मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत हॉटेलच्या आतील बाजूस असलेल्या पोटमाळ्यावर तीन कामगार झोपले होते. त्यातील दोघांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. तर एकावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहे. या आगीचे नेमके कारण समोर आले नाही. त्याचबरोबर या घटनेमधील मृतांची नावे देखील समजू शकली नाही.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच पोलिस दलासह (Pune Police Force) अग्निशमन दलाचे (Fire Brigade)
कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशीरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते.

 

Web Title :  Pune Marketyard Fir News | A major fire in the Marketyard area; 2 workers died, one seriously injured

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा