‘तितली’ चक्रीवादळ आंध्र प्रदेश, ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले

भुवनेश्वर : वृत्तसंस्था

बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या  ‘तितली’ या चक्रीवादळाने प्रचंड स्वरूप धारण केले आहे. तितली चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी पहाटे साडे पाच वाजता येऊन धडकले आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, तितली हे चक्रीवादळ १० किलोमीटर प्रतितास या  वेगाने पुढे सरकते आहे. या वादळामुळे सर्वत्र प्रचंड पाऊस होत असून मोठे नुकसान झाले आहे. ओडिशा व आंध्र प्रदेश सरकारने किनारपट्टी भागातील ३ लाख लोकांना यापूर्वीच सुरक्षितस्थळी हलविले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f2c57f5c-cd05-11e8-9e11-254de975b715′]

गुरुवारी सकाळी हे वादळ ओडिशातील गोपाळपूर आणि आंध्र प्रदेशातील कलिंगापट्टणमच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकले. ओडिशामध्ये प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत जवळपास ३ लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तितली हे चक्रीवादळ भयंकर असून बंगालच्या खाडीतील दक्षिण आणि पश्चिम मध्य क्षेत्राला या वादळाचा फटका बसला आहे. १२ आॅक्टोबरपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

राफेल प्रकरण : डसॉल्टवर लादले गेले रिलायन्स

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी परिस्थितीची माहिती घेतली असून त्यांनी गंजम, पुरी, खुर्दा, केंद्रपाडा आणि जगतसिंहपूर या जिल्ह्यातील कलेक्टरांना तटवर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांची घरे तातडीने रिकामी करण्यास सांगितले आहे. तसेच नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी निवारागृहे उभारण्यास सांगण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B0759SGM63′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’09d14ec3-cd06-11e8-a0b0-03dfb6669019′]

अरबी समुद्रातील चक्रीवादळ येमेनच्या दिशेने

दुसऱ्या बाजूने अरबी समुद्रात उठलेल्या लुबान चक्रीवादळाची गतीही आता वाढून ताशी ११० किलोमीटरवर गेल्यामुळे त्याची तीव्रता वाढली आहे. परंतु ते येमेनच्या दिशेने सरकले असल्यामुळे लक्षद्वीप वगळता भारतावर फारसा परिणाम होणार नाही. गोव्यात काही ठिकाणी  रविवारी व सोमवारी पाऊस पडला होता. मंगळवारीही काही प्रमाणात पाऊस कोसळला. लुबान चक्रीवादळ भारतीय उपखंडापासून दूर जात आहे. तर तितली बंगालच्या उपसागरातून भारतीय भूभागात शिरले आहे. त्यामुळे लुबानपेक्षा तितली चक्रीवादळ अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. चक्रीवादळांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे मच्छीमारांना ७४ किलोमीटरपेक्षा अधिक दूर न जाण्याचा इशारा तटरक्षक दलाने दिला आहे. एरव्ही ९ आॅक्टोबरपर्यंत हा इशारा मर्यादित होता. परंतु प्राप्त परिस्थितीत चक्रीवादळाची वाढलेली गती लक्षात घेता हा इशारा १२ आॅक्टोबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.

You might also like