Cyrus Mistry Death | सायरस मिस्त्री यांच्या अपघाताची चौकशी करा, फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Cyrus Mistry Death | टाटा सन्सचे माजी प्रमुख (Tata Sons Former Head) सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्याने उद्योगक्षेत्राला मोठ्या धक्का बसला आहे. सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर (Cyrus Mistry Death) सर्वच क्षेत्रांकडून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही (PM Narendra Modi) धक्का बसला आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना (DGP) अपघाताची चौकशी (Accident Investigation) करण्याचे आदेश दिले आहेत. ट्विट करुन त्यांनी ही माहिती दिली आहे.

 

पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री (Cyrus Mistry Death) यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास सूर्या नदीवरील (Surya River) पुलावर चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाला. अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दोघे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

DGP यांना चौकशीचे आदेश
प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग आणि आर्थिक जगताची मोठी हानी झाली आहे. भारताची आर्थिक शक्ती ओळखणारे, एक उमदे असे व्यक्तिमत्व होते. विनम्रता हा त्यांचा स्थायीभाव होता. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशा भावना फडणवीस यांनी व्यक्त केल्या. तसेच राज्याच्या पोलीस महासंचालकांना या अपघाताची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

 

Web Title :- Cyrus Mistry Death | cyrus mistry died in a car accident deputy chief minister fadnavis ordered an inquiry

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PPF खातेधारकांसाठी भारतीय पोस्ट देत आहे मोठी सुविधा, घरबसल्या करू शकता हे काम

 

Aurangabad Crime | ‘बायकोला सोड अन् माझ्याशी लग्न कर’, प्रेयसीच्या तगाद्याला वैतागून विवाहित तरूणानं उचललं टोकाचं पाऊल

 

High Court | पत्नीची देखभाल करणे कायदेशीर प्रकारे पतीची जबाबदारी, HC ने फेटाळली याचिका