‘भाईजान’ सलमान खान का सतत शेअर करतोय ‘शर्टलेस’ फोटो ? (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सलमान खानच्या दबंग 3 या आगामी सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. ट्रेलरला चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून सलमान खान त्याचा शर्टलेस फोटो सोशलवर पोस्ट करताना दिसत आहे. अनेकांना याबाबत प्रश्न पडला आहे. खुद्द सलमान खानने याबाबत खुलासा केला आहे. एका मुलाखतीत तो बोलत होता.

सलमान खान म्हणाला, “लोकांना वाटतं की, त्याची बॉडी म्हणजे व्हीएफएक्सची कमाल आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र तसं नाही. फिटनेससाठी जीममध्ये खूप घाम गाळावा लागतो.”

या सिनेमाच्या ट्रेलरचं एडिटींग झाल्यानंतर सलमान खानने हा ट्रेलर पाहिला आणि रिए़डिट केला. त्याची इच्छा होती की, ट्रेलर पाहून प्रेक्षक प्रभावित व्हावेत आणि लोकांमध्ये याची क्रेज कायम रहावी.

दबंग 3 सिनेमा प्रभू देवा डायरेक्ट करत आहे. दबंग 2 हा 2012 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाने जबरदस्त कमाई केली होती. दबंग 3, 20 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. अभिनेते महेश मांजरेकरची मुलगी सई मांजरेकर या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. या सिनेमात सलमानसोबत सोनाक्षी सिन्हादेखील दिसणार आहे.