दाभोलकर हत्या प्रकरण : पुनाळेकरची रवानगी पुन्हा सीबीआय कोठडीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांना पुन्हा सीबीआय कोठडी देण्याची मागणी सीबीआयने बुधवारी न्यायालयात केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत पुनाळेकर यांना सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. यापुर्वी पुनाळेकर यांची रवानगी यापुर्वी न्यायालयीन कोठडी करण्यात आली होती.

पुनाळेकर यांच्या वतीने जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सीबीआयने पुनाळेकर यांना सीबीआय कोठडी देण्याची मागणी केली होती.

त्यावेळी सीबीआयचे वकिल अ‍ॅड. प्रकाश सुर्यवंशी म्हणाले, अ‍ॅड. पुनाळेकर यांच्याकडून मोबाइल संच, लॅपटॉप, पेनड्राइव्ह अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. अ‍ॅड. पुनाळेकर यांच्या मोबाइल संचात असलेल्या माहितीचे तांत्रिक तपासात विश्लेषण करण्यात आले आहे. त्यात सीबीआयला काही महत्वाची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करायचा असल्याने त्यांना पुन्हा सीबीआय कोठडी देण्यात यावी अशी मागणी वकिलांनी केली होती.

पुनाळेकर हे सनातन संस्थेचे साधक आहेत. त्यांनी या प्रकरणातील संशयित शरद कळसकरला ठाण्यातील खाडी पुलावरून पिस्तुल फेकून देण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांना जामिन मंजूर झाल्यास ते पुराव्यात फेरफार करतील. म्हणून त्यांना जामिन मंजूर करण्यात येऊ नये, अशी विनंती अ‍ॅड. सूर्यवंशी यांनी न्यायालयाकडे केली.

त्यावरून ही मागणी मान्य करत पुढील तपासासाठी न्यायालयाने पुनाळेकर यांना सीबीआय कोठडीत पाठविण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा