Dada Bhuse | एकनाथ शिंदे ‘मातोश्री’वर रडल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा, दादा भुसेंची बोचरी टीका म्हणाले-‘छोटे युवराज…’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंड का केले, याबाबत ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पहिल्यांदाच मोठा गौप्यस्फोट केला. भाजपासोबत (BJP) न गेल्यास मला तुरुंगात टाकतील, असं सांगत एकनाथ शिंदे मातोश्रीवर (Matoshree) रडले होते, असा खुलासा आदित्य ठाकरे यांनी केला होता. या दाव्यावरुन मंत्री दादा भूसे (Dada Bhuse) यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरेंवर आता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा प्रभाव पडतोय, असा टोला दादा भूसेंनी (Dada Bhuse) लगावला. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

हा त्यांचा बालीशपणा

आदित्य ठाकरेंची ही केविलवानी धडपड आहे. हा त्यांचा बालीशपणा आहे. त्यांनी ही गोष्ट तेव्हाच सांगायला हवी होती. त्यासाठी 9-10 महिने वाट बघण्याची गरज नव्हती. जर असं होतं तर त्यांनी त्याचवेळी बोलायला हव होतं. 1857 चं त्यांना आज आठवलं तर कसं चालेल. ही राहुल गांधी स्टाईल असल्याचा टोला दादा भूसेंनी (Dada Bhuse) लगावला.

राहुल गांधींचं अनुकरण छोटे युवराज करत आहेत

आदित्य ठाकरे यांना अनेक गोष्टी आता वर्षभरानंतर आठवत आहेत. पण जनतेला हे सर्व समजते, राज्यातील जनता सुज्ञ आहे. राहुल गांधी ज्याप्रकारे विदेशात जाऊन देशाची बदनामी करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल (PM Narendra Modi) चुकीची विधानं करतात. त्याचंच अनुकरण आता छोटे युवराज करत आहेत. हा महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) संगतीचा परिणाम आहे, अशी टीका दादा भूसे यांनी केली.

राहुल गांधी मातोश्रीवर जाणार?

राहुल गांधी हे उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेणार आहेत. याबाबत संजय राऊत (Sanjay Raut)
यांनी माहिती दिली. तर भेटीचं अद्याप कोणतंही नियोजन नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)
यांनी सांगितले आहे. याबाबत दादा भूसे म्हणाले, कोण कोणाची भेट घ्यावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण काँग्रेसला शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis Government) धाक बसला आहे. त्यामुळे त्यांना एकत्र यावं लागत आहे, असं दादा भूसे म्हणाले.

Web Title :- Dada Bhuse | dada bhuse criticized aditay thackeray after statement on cm eknath shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Devendra Fadnavis | डिजिटल तंत्रज्ञान सेवा पुरवठ्यातून अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Political News | ‘फोडाफोडीचे राजकारण करण्यापेक्षा…’ काँग्रेसचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र