Dahi Handi-2022 | दहिहंडी उत्सवासाठी पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त, रात्री 10 पुर्वीच फोडावी लागणार दहिहंडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे दोन वर्षे दहिहंडी उत्सव (Dahi Handi-2022) साजरा करता आला नाही. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मात्र या उत्सावाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. पुण्यात देखील पुणे पोलिसांनी (Pune Police) नियमावली जाहीर केली आहे. याच नियमांनुसार गोविदांना दहीहंडी साजरी (Dahi Handi-2022) करावी लागणार आहे. यंदा रात्री दहा पर्यंत जल्लोष करता येणार आहे.

 

आज कृष्णजन्माष्ठमी झाल्यानंतर उद्या दहीहंडी उत्सव (Dahi Handi-2022) साजरा होणार आहे. यामुळे पुणे पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. शहरामध्ये स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी याशिवाय एसआरपीएफची तुकडी, शीघ्र कृती दल, होमगार्ड, दामिनी पथके, गुन्हे शाखा विशेष शाखेचा साध्या वेशात बंदोबस्त असणार आहे.

 

असा असेल पोलिसांचा बंदोबस्त
राज्य राखीव पोलीस दलाची (SRPF) एक कंपनी, दोन अतिरिक्त पोलीस आयुक्त (Addl CP),
5 पोलीस उपायुक्त (DCP), 69 पोलीस निरीक्षक (Police Inspector), 271 सहायक पोलीस निरीक्षक (API) व
पोलीस उपनिरीक्षक (PSI), 1,916 पोलीस कर्मचारी, स्ट्रायकींगची चार पथके असा एकूण अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त शुक्रवारी शहरात असणार आहे.

 

शहरात 961 दहिहंडी मंडळे
शहरात 961 दहिहंडी मंडळे आहेत. यामध्ये परिमंडळ एकमध्ये 218, परिमंडळ दोन -169,
परिमंडळ तीन -254, परिमंडळ चार -169 आणि परिमंडळ पाचमध्ये 151 अशी मंडळे आहेत.

 

Web Title :- Dahi Handi-2022 | dadi handi celebration in pune only till ten o clock at night order of pune police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 Ajit Pawar | शिंदे सरकारवर नामुष्की? मंत्री अजित पवारांच्या प्रश्नाला उत्तर देण्यात असमर्थ

 

Ajit Pawar | ‘थांबा, तुम्ही 40 आमदार कुठं जाणार नाहीत, ते वरचे 10 असे तसेच’ अजित पवारांची सभागृहात फटकेबाजी

 

Pune Crime | कारागृहातून सुटलेल्या आरोपीने कारागृहातील महिला रक्षकालाच घातला गंडा