Dangerous Apps | ‘हे’ 7 अ‍ॅप्स तुमच्या फोनसाठी धोकादायक ! Google ने बॅन केलीत, आता तुम्ही सुद्धा तात्काळ करा डिलिट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Dangerous Apps | गुगल (Google) ने 7 अ‍ॅप्समध्ये मालवेयर आढळल्यानंतर त्यांना प्ले स्टोअरवरून बॅन केले आहे. जोकर मालवेयरला कॅस्पर्सकी (Kaspersky) च्या तात्याना शिश्कोवा नावाच्या एका मालवेयर विश्लेषकाने उघड केले होते. तात्याना यांना आढळले की, ही 7 अ‍ॅप्स मालवेयर सारख्या ‘ट्रोजन’ जोकर (Trojan Joker) ने प्रभावित होती. अलिकडेच, अनेक स्क्वीड गेम यूजर्सला सायबर गुन्हेगारांच्या मालवेयरच्या (Dangerous Apps) अशाच प्रकारच्या हल्ल्याचा सामना करावा लागला होता.

 

ही समस्या समोर आल्यानंतर Google ने ही अ‍ॅप्स हटवली आहेत. चिंताजनक बाब ही आहे की, लाखो लोकांनी ही अ‍ॅप्स अगोदरच डाऊनलोड केली आहेत, आणि लोक त्यांचा वापर अजूनही करत आहेत. जर तुमच्या फोनमध्ये ही अ‍ॅप्स असतील तर आपल्या फोनमधून त्यांना हटवा आणि आपला डेटा आणि प्रायव्हसी सुरक्षित करा. यासाठी यूजर्सला जास्त सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. तसेच कोणत्याही लिंक किंवा अवैध खरेदीला बळी पडू नये, जी संशयास्पद वाटते.

 

सायबर अटॅकच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, कारण जास्तीत जास्त लोक ऑनलाइन खरेदीवर शिफ्ट होत आहेत.
गेमिंग आतापर्यंत आणखी एक नवीन एरिया बनला आहे, जिथे सायबर अटॅक वाढत आहेत. जर तुमच्या फोनमध्ये सुद्धा दिलेल्या यादीतील अ‍ॅप्स असतील तर ताबडतोब डिलिट करा. (Dangerous Apps)

 

पहा 7 धोकादायक अँड्रॉईड अ‍ॅप्सची यादी (Dangerous Apps) :

 

  • Now QRcode Scan (10,000 पेक्षा जास्त इन्स्टॉल झाले आहेत)
  • EmojiOne Keyboard (50,000 पेक्षा जास्त इन्स्टॉल झाले आहेत)
  • Battery Charging Animations Battery Wallpaper (1,000 पेक्षा जास्त इन्स्टॉल झाले आहेत)
  • Dazzling Keyboard (10 पेक्षा जास्त इन्स्टॉल झाले आहेत)
  • Volume Booster Louder Sound Equalizer (100 पेक्षा जास्त इन्स्टॉल झाले आहेत)
  • Super Hero-Effect (5,000 पेक्षा जास्त इन्स्टॉल झाले आहेत)
  • Classic Emoji Keyboard (5,000 पेक्षा जास्त इन्स्टॉल झाले आहेत).

 

Web Title : Dangerous Apps | bans these 7 apps from google play store as they are stealing users data if you have any delete it now from phone

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | सोन्याच्या दरात आली तेजी, आज किती रूपयांनी महागले 1 तोळा सोने, जाणून घ्या

Ganesh Jagtap | पुणे शहर पोलिस दलातील गणेश जगताप यांचा ‘इंडियन एम्पायर युनिव्हर्सिटी’कडून ‘डॉक्टरेट’ पदवी देऊन ‘सन्मान’; अभिनेते सुमन यांचा देखील ‘गौरव’

Pune Navale Bridge Accident | नवले पुलाजवळ पुन्हा अपघात ! सुदैवाने जीवित हानी नाही, वाहनांच्या लांबच लांब रांगा (व्हिडीओ)