Darshana Pawar Murder Case | दर्शना पवार खून प्रकरणात मोठं अपडेट, राहुल हंडोरेनं…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Darshana Pawar Murder Case | एमपीएससी परीक्षा (MPSC Exam) उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी 18 जून रोजी आढळून आला होता. दर्शना पवार हिच्या हत्येप्रकरणी (Darshana Pawar Murder Case) राहुल हंडोरे (Rahul Handore) याला पुणे पोलिसांनी (Pune Police) मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवरून (Andheri Railway Station) अटक केली. दर्शना पवार हिनं लग्नासाठी नकार दिल्याने तिचा खून केल्याची कबुली राहुलने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दर्शनाचा खून (Darshana Pawar Murder Case) करण्यासाठी आरोपी राहुल हंडोरे याने कंपासमधील कटरचा (Cutter) उपयोग केला. हे कटर पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच आरोपी आणि दर्शना यांनी राजगडला (Rajgad) जाण्यासाठी वापरलेली दुचाकी आणि खून करताना आरोपीने घातलेले कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत. पुढील तपासासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीमध्ये सोमवारपर्यंत (3 जुलै) वाढ करण्यात आली आहे.

दर्शना पवार हिने लग्नाला नकार दिल्याने रागाच्या भरात तिच्यावर कंपासमधील कटर ब्लेडने तीन ते चार वेळा वार केले. यानंतर दगडाने मारहाण करत तिचा खून केला, अशी कबुली राहुल हंडोरे याने पोलिसांना दिली होती. त्यानुसार त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या वस्तूंची माहिती घेत त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

राहुल हांडोरेच्या पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी (दि.29 जून) संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. हंडोरे याने गुन्ह्यासाठी आणखी दोन शर्ट वापरले होते. ते अद्याप जप्त केलेले नाहीत. तसेच खून करुन तो काही दिवस फरार होता. दरम्यानच्या काळात त्याला कोणी मदत केली आहे का? तो नेमका कोणत्या ठिकाणी राहिला, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांकडून (Public Prosecutors) करण्यात आली.

त्यावर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. गणेश माने (Adv. Ganesha Mane) यांनी युक्तिवाद केला. गुन्ह्याचा प्राथमिक तपास पूर्ण झालेला आहे. त्यामुळे आरोपी राहुल हांडोरेच्या पोलीस कोठडीची गरज नसून न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी द्यावी, असा युक्तीवाद अ‍ॅड. माने यांनी केला. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे, असे नमूद करत न्यायालयाने राहुल हांडोरेच्या पोलीस कोठडीत (Police Custody) सोमवार (दि.3 जुलै) पर्यंत वाढ केली आहे.

Web Title :  Darshana Pawar Murder Case | Big update on Darshana Pawar murder case, Rahul Handore…

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा