Darshana Pawar Murder Case | … म्हणून राहुल हंडोरेनं MPSC Topper दर्शना पवारचा केला खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Darshana Pawar Murder Case | राजगड किल्ल्याच्या (Rajgad Fort) पायथ्याशी एमपीएससी उत्तीर्ण तरुणी दर्शना पवारच्या हत्या (Darshana Pawar Murder Case) प्रकरणी मित्र राहुल हंडोरे (Rahul Handore) याला अटक (Arrested) करण्यात आली आहे. दर्शना पवारचा मृतदेह (Dead Body) राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला होता. दि.12 जून रोजी ती राजगडावर राहुल हंडोरेसोबत फिरायला गेली होती. 18 जून रोजी राजगडावर दर्शना पवारचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे पुण्यासह (Pune) राज्यात खळबळ उडाली होती.

राहुल हंडोरे वेगवेगळ्या राज्यात फिरत होता. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांचे (Pune Rural Police) पाच पथके त्याचा शोध घेत होते. अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुलला मुंबईतून (Mumbai) ताब्यात घेतले आहे. एमपीएससी उत्तीर्ण होऊन दर्शना पवार (Darshana Pawar Murder Case) हिची वन अधिकारी पदी निवड झाली होती. त्यानिमित्त पुण्यात सत्कार समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर दर्शना बेपत्ता होती. तिच्या आई वडिलांनी पोलिसात ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.

दि. 9 जून रोजी पुणे येथे वनविभागाचे परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून उतीर्ण झाल्याबद्दल सत्कार घेण्यासाठी आली होती. त्यानंतर ती दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंत कुटुंबाच्या संपर्कात होती. मात्र त्यानंतर तिने घरच्यांचा फोन उचलला नाही. त्यामुळे दर्शनाचे घरचे घाबरले होते. घरच्यांनी पुणे येथे चौकशी केली असता ती तिचा मित्र राहुल हंडोरे याच्या बरोबर सिंहगड व राजगड पाहण्यासाठी गेले असल्याचे समजले होते.

दरम्यान, दर्शनाचा मृतदेह सापडल्यानंतर तिचा मित्र राहुल हांडोरे याचा शोध पोलीस घेत होते. दर्शनाच्या हत्या (Murder) त्याने केल्याचा संशय आहे. राहुलचे अखेरचे लोकेशन कात्रजमध्ये दिसून आले होते. त्यानतंर दोन दिवसांनी दिल्लीत एटीएममधून पैसे काढल्याची माहिती समोर आली होती. तर रविवारी रात्री नातेवाईकाशी फोनवर बोलला होता. परराज्यातही त्याचे लोकेशन आढळले होते. अखेर त्याला मुंबईतून अटक (Arrested) केली.

का केली हत्या?

दर्शना आणि राहूल लहानपणापासूनच एकमेकांच्या ओळखीचे होते. दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. दोघेही एमपीएससीची परीक्षा (MPSC Exam) देत होते. मात्र या प्रयत्नांमधे दर्शनाला आधी यश आले आणि तिने वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण केली. वन अधिकारी बनण्याची फक्त औपचारिकता उरली होती. त्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्‍या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे राहुल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने त्याला एम पी एस सीची परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा. तो देखील परिक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल असे दर्शना आणि तीच्या कुटुंबियांना सांगून पाहिले. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहुल हंडोरेने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली.

Web Title :  Darshana Pawar Murder Case | darshana pawar murder case suspect rahul handore arrested from mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा