Dasara Melava 2022 | उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाईल, पण…, नारायण राणे यांचे मोठं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava 2022) येत्या 5 ऑक्टोबरला होणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क (Shivaji Park) तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा वांद्र्याच्या बीकेसी मैदानावर (BKC Ground Bandra) होणार आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत (Dasara Melava 2022) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे.

 

उद्धव ठाकरे यांनी मला दसरा मेळाव्याला (Dasara Melava 2022) आमंत्रण दिले तर जाईल. पण मला ते देणार नाहीत, असे राणे म्हणाले. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे शिवसैनिक (Shiv Sainik) आहेत त्यांनी शिंदे गटात सहभागी व्हावे कारण उद्धव ठाकरे यांची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

 

अडीच वर्षे या राज्याला ज्यांनी मागे नेले त्यांचे नाव घ्यायचे नाही आणि जे पक्ष त्यांना पाठींबा देत आहेत त्यांची अवस्था सध्या काय आहे.
मग ते काँग्रेस (Congress) असो वा राष्ट्रवादी (NCP), या शब्दात त्यांनी निशाणा साधला.
त्यांच्याकडे उमेदवार राहिले नाहीत. सर्व शिंदे गटात गेले आहेत, असा टोला राणे यांनी लगावला.

आता भावनेचा विचार करुन निवडणूक लढत आहेत,
अशा शब्दात राणे यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरुन (Andheri East by Election) उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
ते म्हणाले, जनता भावनेवर मतदान करणार नाही. तर विकासावर मतदान होईल.
निवडणुकी आधी चिन्हाचा निर्णय होईल, असेही ते म्हणाले. तर देशद्रोही यांच्यावर कारवाई होत राहील,
आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी पुरावा दाखवला असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले.

 

Web Title :- Dasara Melava 2022 | union minister narayan rane said if uddhav thackeray will invite the i will go to dasara melava

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | राज्यात दसरा मेळाव्यावरुन जे राजकारण सुरु आहे ते दुर्दैवी, शरद पवारांनी दिला ‘हा’ सल्ला

Legends League | LIVE मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जॉन्सनकडून युसूफ पठानला धक्काबुक्की

Ind vs SA T20 | चक्क अम्पायरच नियम विसरले, गुवाहाटीत अम्पायर्सने केली ‘ही’ मोठी चूक