Dasara Melava | जर एकाचवेळी दसरा मेळाव्याचे भाषण सुरू झाले तर कुणाचे भाषण प्रथम ऐकाल, ठाकरे की शिंदे? अजित पवारांनी दिले हे उत्तर…

पुणे : मुंबईतील शिवतीर्थावर (Shivtirtha) शिवसेनेचा (Shivsena) पारंपारिक दसरा मेळावा (Dasara Melava) होणार आहे, तर दुसरीकडे बीकेसीतील मैदानावर (BKC Ground) बंडखोर शिंदे गटाचा (Shinde Group) दसरा मेळावा (Dasara Melava) होणार आहे. या मेळाव्याकडे आता महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. यावरूनच आज पत्रकारांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांना (Ajit Pawar) प्रश्न विचारला की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे भाषण एकाच वेळी सुरू झाले तर प्रथम कुणाचे भाषण ऐकाल? यावर अजित पवार म्हणाले, मी प्रथम उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकेन. त्यानंतर टीव्हीवर रिपीट करण्यात येणारे एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकेन. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

दसरा मेळाव्याच्या राजकारणावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, शिवसेनेशी असलेला ऋणानुबंध शेवटपर्यंत जपण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) करेल. मोठमोठे राजकीय मेळावे (Dasara Melava) केले जातात, तेव्हा कार्यकर्त्यांना बोलावले जाते. तेव्हा अशा घटना घडत असतात. दोन्ही गटांमध्ये कोणाचा दसरा मेळावा मोठा? यावरुन इर्षा निर्माण झाली आहे. नियमांचे पालन करुन आपापला दसरा मेळावा मोठा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या दौर्‍याबाबत अजित पवार म्हणाले,
राज ठाकरे यांनी दौरे काढले तर तुम्हाला काय त्रास होतो?
प्रत्येक पक्षाच्या नेत्याला राज्यात दौरे काढण्याचा अधिकार आहे.
मतदारांना ज्याची भूमिका पटेल, त्याच्या पाठिशी लोक उभे राहतील.

शाळेत देवी-देवतांचे लावण्यात येणार्‍या फोटोबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)
यांनी केलेल्या त्या वक्तव्यावर सावध प्रतिक्रिया व्यक्त करताना अजित पवार म्हणाले,
ते छगन भुजबळ यांचे वैयक्तिक मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तसे मत नाही.
पण प्रत्येकाला त्याच्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी यावेळी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल केलेल्या गौप्यस्फोटावर बोलणे टाळले.
2014 मध्ये भाजपाला बाजूला करून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यासाठी एकनाथ शिंदे हे आघाडीचा प्रस्ताव घेऊन आले होते, असा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला होता.

Web Title :- Dasara Melava | if uddhav thackeray and eknath shinde speech start at same time in dasara melava dussehra melava 2022 what will you do ajit pawar reaction

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nana Patole | ‘नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…’, नाना पटोलेंच्या टीकेला भाजपचे प्रत्युत्तर म्हणाले- ‘या संघाच्या शाखेत’

Shivsena | शिवसेनेकडून अर्थमंत्री सीतारामन यांच्यावर प्रश्नांचा भडीमार! प्रकल्प गेल्याचे दुःखही महाराष्ट्राने व्यक्त करू नये का?