×
Homeताज्या बातम्याShivsena | शिवसेनेकडून अर्थमंत्री सीतारामन यांच्यावर प्रश्नांचा भडीमार! प्रकल्प गेल्याचे दुःखही महाराष्ट्राने...

Shivsena | शिवसेनेकडून अर्थमंत्री सीतारामन यांच्यावर प्रश्नांचा भडीमार! प्रकल्प गेल्याचे दुःखही महाराष्ट्राने व्यक्त करू नये का?

मुंबई : Shivsena | 2024 मधील लोकसभा निवडणुकीच्या (2024 Lok Sabha Elections) पूर्वतयारीसाठी बारामती दौर्‍यावर आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्पावरून (Vedanta- Foxconn project) संताप व्यक्त करणार्‍या भाजपाविरोधी (BJP) पक्षांवर टीका केली होती. तसेच यावेळी शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी तळेगावमध्ये आंदोलन करून हा प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निमित्ताने आंदोलन करून सीतारामन यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. यावरून आता शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केंद्रीय अर्थमंत्र्यांवर प्रश्नांचा भडीमार केला आहे.

सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, वेदांतासारखा महाराष्ट्राच्या हक्काचा प्रकल्प, त्यामुळे निर्माण होणारा लाखावर जनतेचा रोजगार एक झटक्यात हिरावला गेला, हे दुःखही महाराष्ट्राने व्यक्त करू नये? या वेदनेचा हुंकार मराठी जनतेने देऊ नये? त्याचा जाबही केंद्र सरकारला (Central Government) विचारू नये? तो विचारला तर त्यावरूनही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आगपाखड करायची, हा कुठला प्रकार?

सीतारामन मॅडम, वेदांतावरून विरोधकांना विचारणा करण्यापूर्वी तुम्हीच आधी काही प्रश्नांची उत्तरे द्या. वेदांता प्रकल्प नको असे एखादे आंदोलन महाराष्ट्रात झाले का? हा प्रकल्प गुजरातमध्येच व्हावा, अशी मागणी गुजरातमधील जनतेने कुठे आणि कधी केली? फक्त केंद्र सरकारचीच मंजुरी बाकी असताना प्रकल्प महाराष्ट्रातून गायब कसा झाला? महाराष्ट्राच्या मनात उसळणारे असे असंख्य रास्त सवाल आहेत. आधी त्यांचे जवाब द्या आणि मग विरोधकांवर आगपाखड करा.

शिवसेनेने (Shivsena) पुढे म्हटले आहे की, नाणार-वाढवण असो, बुलेट ट्रेन (Bullet Train) असो की आरेमधील मेट्रो कारशेड (ARE Metro Car Shed) या सर्व प्रकल्पांना झालेला विरोध हा ’पब्लिक क्राय’ होता, म्हणून शिवसेनेने त्याचे समर्थन केले. विकास व्हायलाच हवा, पण त्यासाठी जनतेने किती किंमत मोजायची याचाही विचार व्हायला हवा. वेदांता हा मोठा प्रकल्प गुजरातला गेला याचा पोटशूळ महाराष्ट्राला कधी होणार नाही. शिवसेना तर गुजरातला नेहमी जुळा भाऊ मानत आली आहे, पण प्रश्न महाराष्ट्राच्या न्याय हक्काचाही आहेच.

Web Title :- Shivsena | nirmala sitharaman madam first answer vedantas questions many questions from shivsena to finance minister

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | महिलेवर लैंगिक अत्याचार करुन 66 लाखाची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक, देहूरोड परिसरातील घटना

Police Suspended | शिक्रापूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार निलंबित

Skin Health | त्वचेसाठी विषापेक्षा कमी नाहीत ‘हे’ 4 पदार्थ, आजच खाणे बंद करा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News