Dasra Melava 2022 | बापरे! शिंदे गटाचा राजेशाही दसरा मेळावा, 1700 एसटी बसेससाठी 10 कोटी रोख भरले, 2 दिवस लागले पैसे मोजायला!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बीकेसीतील दसरा मेळाव्यासाठी (Dasra Melava 2022) शिंदे गटाच्या (Shinde Group) मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. राज्यभरातून समर्थकांना मुंबईत आणण्यासाठी शिंदे गटाने तब्बल 1700 एसटी बसेस (ST Bus) बुक केल्या आहेत. यासाठी तब्बल 10 कोटी रुपये रोख भरले आहेत. हे पैसे मोजण्यासाठी महामंडळाला दोन दिवस लागले. (Dasra Melava 2022)

 

शिंदे गट मोठ्याप्रमाणात पैसा खर्च करून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. दसर्‍याला प्रथमच इतकी मोठी बुकिंग एसटी महामंडळाला (ST Mahamandal) मिळाली आहे. मुंबईच्या बीकेसी मैदानावरील (BKC Ground) शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी वर्धा जिल्ह्यातील आठ तालुक्यातून 12 बसेसने कार्यकर्ते रवाना झाले आहेत. वर्ध्यात शिंदे गटाच्या कार्यालयासमोरून सकाळी बसला झेंडा दाखवला. शिंदे गटाकडून जिल्ह्यातून बसने कार्यकर्ते मुंबईला पाठविण्यात आले आहेत. मात्र शिवसेनेकडून (Shivsena) जिल्ह्यात कोणत्याही हालचाली दिसत नाही.

 

दसरा मेळाव्यासाठी (Dasra Melava 2022) नाशिकमधून सुद्धा शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
शिंदे गटाने नाशिकमधून बीकेसीच्या मैदानावर 50 हजाराहून अधिक शिवसैनिक (Shiv Sainik) जाणार असल्याचा दावा केला आहे.
नाशिक मधून तब्बल 337 बसेस आणि 424 चारचाकी वाहनांचे नियोजन करण्यात आले
असून या सर्व वाहनांमधून तब्बल 40 ते 50 हजार शिवसैनिक बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याला हजेरी लावतील, असे सांगण्यात आले.

 

दरम्यान, शिवसेनेने दावा केला आहे की, आम्हाला भाड्याने लोक आणण्याची गरज नसून जे येतील ते कट्टर शिवसैनिक असतील.

 

Web Title :- Dasra Melava 2022 | shinde group paid rs 10 crore in cash for 1700 st bus booking for dasara melava

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule | RSS च्या राष्ट्रीय नेत्याचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक, म्हणाल्या – ‘काही गोष्टी वास्तविकतेसाठी आणि देशासाठी…’

CM Eknath Shinde | ‘कोण कोणाबरोबर आहे हे उद्या कळेल’, दसरा मेळाव्याच्या एक दिवस आधी एकनाथ शिंदेंचे मोठं विधान

Pune PMC News | ‘…तोपर्यंत पुणे महापालिकेचे स्वच्छ भारत स्पर्धेतील स्थान खालीच राहाणार विक्रम कुमार, प्रशासक आणि महापालिका आयुक्त