Supriya Sule | RSS च्या राष्ट्रीय नेत्याचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक, म्हणाल्या – ‘काही गोष्टी वास्तविकतेसाठी आणि देशासाठी…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Supriya Sule | आज माझ्या वाचनात असे आले की, आरएसएसच्या (RSS) एका वरिष्ठ नेत्याने महागाई आणि बरोजगारीबाबत सविस्तर भाष्य केले आहे. मी त्यांचे मनापासून स्वागत करते. कारण काही गोष्टी वास्तविकतेसाठी आणि देशासाठी खूप महत्त्वाच्या असतात, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार (NCP MP) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे (Dattatreya Hosbale) यांचे नाव न घेता कौतुक केले. आज बारामतीच्या दौर्‍यावर असताना त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

 

सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, आज माझ्या वाचनात असे आले की, आरएसएसच्या एका वरिष्ठ नेत्याने महागाई आणि बरोजगारीबाबत सविस्तर भाष्य केले आहे. मी त्यांचे मनापासून स्वागत करते. कारण काही गोष्टी वास्तविकतेसाठी आणि देशासाठी खूप महत्त्वाच्या असतात. मागील दीड ते दोन वर्षांपासून आम्ही सगळेजण संसदेत देशातील महागाई, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेबाबत सातत्याने बोलत आहोत.

 

त्या पुढे म्हणाल्या, पण यामध्ये कुठलेही राजकारण न आणता आरएसएसच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेबाबत जो मुद्दा मांडण्यात आला, त्याचे मी मनापासून स्वागत करते. हा देशाचा प्रश्न आहे. याबद्दल केंद्र सरकारला (Central Government) माझी विनंती आहे, त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल, बेरोजगारी आणि महागाईबद्दल गंभीर होणे अतिशय गरजेचे आहे.

दरम्यान, आरएसएसचे वरिष्ठ राष्ट्रीय नेते दत्तात्रेय होसबाळे यांनी रविवारीस्वदेशी जागरण मंचाच्या
‘स्वावलंबी भारत अभियान’ (Swavalam Bharat Abhiyan) या उपक्रमांतर्गत व्याख्यानमालेत बोलताना देशातील महागाई आणि बेरोजगारीबाबत चिंता व्यक्त केली होती.
होसाबळे म्हणाले, देशातील गरिबी, बेरोजगारी आणि वाढती विषमता ही चिंतेची बाब असून,
तरुणांना उद्योगांकडे वळवून रोजगार मागणारे हेच रोजगारदाते बनतील, यासाठी प्रयत्न करायला हवेत.

 

Web Title :- Supriya Sule | ncp mp supriya sule on rss senior leader dattatrey hosabale

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | 6 ऑक्टोबर रोजी ‘नैसर्गिक शेती’ कार्यशाळेचे आयोजन

Police Inspector Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलातील ‘त्या’ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली

Pune Water Supply | पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार