CBSE 10 वी आणि 12 वी च्या बोर्डाच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ३१ डिसेंबर रोजी १० वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर करत, ४ मे ते १० जून या दरम्यान परीक्षा घेण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु मात्र CBSE दहावी परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नव्हती. मात्र सीबीएसई बोर्डाच्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचं वेळापत्रक बोर्डाने जाहीर केलं आहे. दहावीची परीक्षा ४ मेपासून सुरू होणार असल्याचं सीबीएसईने आधीच जाहीर केलं आहे. आता या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जाहीर झालं आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) वेबसाईट cbse.gov.in आणि cbseacademic.nic.in या अधिकृत संकेतस्थळांवर हे वेळापत्रक अपडेट करण्यात येईल. यंदाच्या वर्षी कोरोनाच्याच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा लांबणीवर पडली होती. दरवर्षी मार्च महिन्यात होणाऱ्या १० वी १२ वीच्या परीक्षा यंदा मे मध्ये घेण्यात येतील. या दोन्ही बोर्डाच्या परीक्षांचं टाइमटेबल मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी दिली होती. परंतु आज वेळापत्रक वेबसाईटवर जाहीर करण्यात आलं आहे.

या दरम्यान, शिक्षण मंडळाने गणित, सामाजिक विज्ञान, विज्ञानसह सर्व विषयांसाठी सीबीएसईच्या १० वीच्या नमुन्यांचे पेपर अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहेत. सीबीएसईच्या १० वीच्या नमुन्यांमध्ये मागील वर्षी विचारले गेलेले सर्व प्रश्न आणि प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नची कल्पना येण्यासाठी हे जाहीर केलं आहे.

दहावी सीबीएसई वेळापत्रक असं करा डाउनलोड-

cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.

– नवीन वेबसाईटवर क्लिक करा.

– CBSE Class 10 date sheet 2021 वर क्लिक करा.

– त्यानंतर CBSE च्या वेळापत्रकाची PDF डाउनलोड करा.