‘यदा कदाचित’ नाटकाचे निर्माते दत्ता घोसाळकर यांचे निधन

ठाणे :‘यदा कदाचित’ या लोकप्रिय नाटकाचे निर्माते दत्ता घोसाळकर यांचे ठाण्यातील महागिरी येथील निवासस्थानी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

जवाहरबाग स्मशानभूमीत आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.निर्माते दत्ता घोसाळकर यांनी ‘यदा कदाचित’ हे नाटक २००० साली रंगमंचावर आणले. या नाटकात एकही लोकप्रिय अभिनेता, अभिनेत्री नव्हते. संजय पवार लिखित या नाटकाने रंगमंचावर धुमाकुळ घातला. त्याचे साडेचार हजाराहून अधिक प्रयोग झाले.त्याचे ‘यदा कदाचित रिटर्न’ हे नाटक येत्या २६ डिसेंबरपासून पुन्हा रंगमंचावर येणार होते. कोरोनानंतरचा त्याचा पहिला प्रयोग होणार होता. त्याचबरोबर ते आणखी दोन प्रोजेक्टवर काम करीत होते. अशातच त्यांना काळाने ओढून नेले.