Dattatray Bharne | राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला ‘कबड्डी’ खेळाचा मनसोक्त ‘आनंद’ (व्हिडीओ)

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – | भवानीनगर या ठिकाणी आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे (Adya Krantiguru Lahuji Vastad Salve) यांच्या 227 व्या जयंती निमित्त लहुजी शक्ती सेना इंदापूर (Lahuji Shakti Sena Indapur) तालुक्याच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खेळाडूंनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांना कब्बड्डी खेळण्याचा आग्रह केला. यानंतर खेळाडूंच्या आग्रहाखातर दत्ता भरणे यांनी मैदानात उतरून कब्बड्डी (Kabaddi) खेळाचा मनसोक्त आनंद घेतला.

 

2009 मध्ये दत्ता भरणे यांनी इंदापूरातून (Indapur) अपक्ष निवडणूक लढवत हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांना जोरदार टक्कर दिली होती. पण या निवडणुकीत दत्ता भरणे यांचा निसटता पराभव झाला होता. यानंतर दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव केला. तसेच ते 2019 मध्ये पण इंदापूर मतदार संघातून निवडून आले आहेत. सध्या ते ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.

 

Web Title :- Dattatraya Bharne | minister dattatraya dattatray bharne enjoys playing kabaddi in indapur of pune district marathi news policenama video

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Corona Europe | ‘कोरोना’मुळे युरोपातील पर्यटनाला पुन्हा ‘ब्रेक’; ऑस्ट्रियात पुन्हा लॉकडाऊन, जर्मनीमध्येही परिस्थिती बिघडली

Gautam Gambhir | ‘आधी तुझ्या मुलांना बॉर्डरवर पाठव, त्यानंतरच…’ गंभीरनं दिला सिद्धूला सल्ला (व्हिडिओ)

Pune Crime | पुण्यात दुध घेण्यासाठी बाहेर पडलेल्यांचे मोबाईल चुटकीत ‘गायब’ करणारा CCTV मध्ये कैद ! पुण्याच्या मध्यवस्तीसह भारती विद्यापीठ अन् वारजे माळवाडी परिसरातून चोरलेले 22 हॅन्डसेट जप्त