बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या बापाचा मुलीकडून कुऱ्हाडीने सपासप वार करून खून

उत्तरकाशी (उत्तराखंड) : वृत्तसंस्था – बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या जन्मदात्या पित्याचा कुऱ्हाडीने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय तरूणीने आपल्या पित्याचा खून केल्याची घटना उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात आज घडली आहे. या घटनेनंतर पीडित मुलीला पोलिसांनी अटक केली असून या घटनेमुळे परसिरात खळबळ उडाली आहे.

मुलगी एका कार्य़क्रमावरून घरी आल्यानंतर घरामध्ये झोपली होती. त्यावेळी तिचे वडील तिच्या खोलीत आले. त्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने त्याला विरोध केला मात्र, तो ऐकत नसल्याने तिने कोपऱ्यात ठेवलेल्या कुऱ्हाडीने एकामागून एक सपासप वार केले. कुऱ्हाडीचे वर्मी घाव बसल्याने वडीलांचा जागीच मृत्यू झाला.

हा प्रकार घडल्यानंतर काही वेळाने नातेवाईक घरी आले. त्यावेळी मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. मुलीकडे चौकशी केली असता तिने घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितला. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला ताब्यात घेतले. घटना घडली त्यावेळी दोघेच घरात असल्याची माहिती स्थानिकाने दिली.

पोलिसांनी मुलीकडे चौकशी केली असता वडीलांनी बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. पोलिसांनी तपास सुरु केला असून दोघांमध्ये वाद असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. मुलीचा जबाब आणि मिळालेल्या माहिती या दोन्हींच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक