दाऊदचा हस्तक जबीर मोतीला लंडनमध्ये अटक

लंडन : वृत्तसंथा

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय आणि सर्व आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या जबीर मोतीच्या मुसक्या आवळल्या आहेत. इंग्लंडच्या सुरक्षा यंत्रणांनी लंडनमध्ये जबीर मोतीवर कारवाई केली. पाकिस्तानी नागरिक असलेला जबीर मोती हा डी-कंपनीच्या तिजोरीचा सर्वेसर्वा आहे. दाऊदचे आर्थिक व्यवहार जबीर मोती पाहतो. शिवाय, युरोप, आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशियातही दाऊदचे काम जबीरच पाहतो.

[amazon_link asins=’B0002E3MP4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c9a12a68-a36f-11e8-862e-8919e2f50b46′]

जबीर मोती ब्रिटनमध्ये राहत होता. दाऊदची पत्नी महजबीन, मुलगी महरीन आणि जावाई जुनैद (माजी पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियाँदादचा मुलगा) यांच्यातील आर्थिक व्यवहारांच्या चौकशीनंतर हिल्टन हॉटेलमधून जबीर मोतीला ताब्यात घेण्यात आले. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी दाऊद इब्राहिम मोस्ट वाँटेड आहे. अमेरिकेच्या ट्रेजरी विभागानेही २०१३ साली दाऊदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले होते. अंमली पदार्थांची तस्करी, खंडणी वसुली, हत्या, धमकी यांसारखे शेकडो आरोप, गुन्हे, तक्रारी दाऊदविरोधात आहेत.

दरम्यान, दाऊद इब्राहिम पाकिस्तानात लपलेला असल्याचे वृत्त अनेकदा आले आहेत. मात्र पाकिस्तान सरकारने कायमच हे वृत्त फेटाळले आहेत.