सिंहगड रोड परिसरात संशयास्पदरित्या महिलेचा मृतदेह आढळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  सिंहगड रोड परिसरात हिंगणे खुर्द येथील शिव पार्वती बंगला येथे एका महिलेचा मृतदेह संशयास्पदरित्या मिळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

कस्तुरी शेखर माने (वय-45, रा. शिवपार्वती बंगला साईनगर हिंगणे खुर्द) असे मयत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कस्तूरी माने या हिंगणे खुर्द येथील साईनगर परिसरात शिव पार्वती बंगल्यात राहण्यास होत्या.  त्या मागील ३ वर्षांपासून पतीपासून विभक्त होऊन येथे राहात होत्या. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी व मुलगा राहात होते. दरम्यान आज दोघेही शाळेत गेले होते. तर घरमालक समोरील परिसरात असलेल्या दत्तमंदिराकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा अर्धवट उघडा दिसला. त्यानंतर त्यांनी लक्षपुर्वक पाहिले तेव्हा कस्तूरी बेडवर पडलेल्या दिसल्या.  त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तेव्हा महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.