‘अडल्ट’ स्टार जेसिका जेम्सचा ‘संशयास्पद’ मृत्यू, घरात सापडला मृतदेह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अडल्ट सिनेमात काम करणारी अभिनेत्री म्हणून प्रकाशझोतात आलेली जेसिका जेम्स हिचे निधन झाले आहे. लॉस एंजेलिस येथील एका अपार्टमेंटमध्ये तिचा मृतदेह मिळाला. 2002 पासून अडल्ट सिने इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असलेल्या जेसिकाचे खरे नाव जेसिका मायकल रीडिंग होते. लॉस एंजेलिसचे काउंटी पोलीस सध्या पुढील तपास करत आहेत.

एका मिडिया रिपोर्टनुसार जेसिकाच्या पतीला ती अपार्टमेंटमध्ये बेशुद्ध अवस्थेत दिसली. जेसिकाचा पती मागील काही दिवसांपासून तिच्याशी बोलत नव्हता. काल तो तिला तिच्या घरी भेटण्यासाठी गेला. त्याने आवाज दिल्यावर तिच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. घरात गेल्यावर त्याला जेसिका बेशुद्धावस्थेत सापडली. यानंतर पतीने तिला नेण्यासाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले, परंतू संध्याकाळी 4.20 वाजता तिला मृत घोषित करण्यात आले. एका रिपोर्ट्सनुसार तिला झटके देखील यायचे. तिच्या घरातून एक औषधांची यादी देखील पोलिसांना तपासात मिळाली.

Jessica James

वयाच्या 26 वर्षी जेसिकाने अडल्ड फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. जवळपास 17 वर्षाच्या करिअरमध्ये तिने 230 पेक्षा जास्त अडल्ट सिनेमांमधून काम केले होते. जेसिकाने 2016 आणि 2017 मध्ये Weeds च्या दोन एपिसोडमध्येही काम देखील केले होते. 2005 साली जेसिकाला हसलर मँग्जिनकडून विशेष अ‍ॅवॉर्ड मिळाला होता.

अडल्ट इंडस्ट्रीजमध्ये येण्याआधी जेसिका एका शाळेत शिक्षिका होती. जेसिकाचा जन्म अलास्का येथे झाला होता. तिने न्यू मॅक्सिको मिलिटरी इंस्टिट्यूटमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले होते, तिची आई ही चेक रिपब्लिकची होती, तर तिचे वडील फ्रान्सचे होते. जेसिकाचे वडील अमेरिकेतील ड्रग एनफोर्समेंट एजन्सीमध्ये अंडरकव्हर एजंट होते.
Jessica james

Jessica James

Visit – policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like