कृष्ण, शंकर, नारद तर कधी शालेय विद्यार्थी, माजी खासदार शिवकुमार यांची रूपे ! जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीडीपीचे माजी खासदार एन. शिवप्रसाद अनेक गोष्टींमुळे सातत्याने चर्चेत असत. कधी कृष्ण, कधी शंकर तर कधी नारद असे अनेक प्रकारचे वेष धारण केल्यामुळे देखील त्यांची मोठ्या प्रमाणावर चर्चा होता असे. शिवप्रसाद यांचे नुकतेच दीर्घ आजाराने शनिवारी रुग्णालयात निधन झाले. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी शिवप्रसाद चक्क स्त्रीवेषात संसद भवनात पोहोचले होते. नारद ते सुदामा आणि भगवान कृष्णा ते भोलानाथ पर्यंत वेशभूषा केल्याबद्दल एन शिवप्रसाद यांना त्यांच्या संसदीय मतदार संघासह संसदेतही ओळखले जात असे.
N Shivprasad
शिवप्रसाद गेले अनेक दिवस आजारी होते आणि चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवप्रसाद यांच्या निधनाबद्दल आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांनी शोक व्यक्त करत ते त्यांचे चांगले मित्र असल्याचे म्हटले. त्यांच्या मृत्यूने चित्तूरच नव्हे तर संपूर्ण आंध्र प्रदेशाचेही मोठे नुकसान झाले आहे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
N Shivprasad
संसद अधिवेशनात शिवप्रसाद त्यांच्या निषेध करण्याच्या वेगवेगळ्या मार्गांमुळे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. गेल्या लोकसभेच्या एका अधिवेशनात ते एकदा महिला म्हणून वेशात साडी घालून संसदेत पोहोचले. तेलगू महिलेच्या रूपाने आलेल्या शिवप्रसाद यांनी आंध्रला विशेष दर्जा देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती.
N Shivprasad
एकदा शिवप्रसाद मच्छीमाराचा वेष घेऊन संसद भवनात पोहोचले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या जाळ्यात पकडण्याविषयी बोलले होते. तर एकदा संसदेच्या अधिवेशनात शिवप्रसाद शालेय विद्यार्थी म्हणून संसद भवनात पोहोचले. शिवप्रसाद हाफ पॅन्टमध्ये कॅम्पसमध्ये फिरताना दिसले होते आणि त्यांच्या हातात पेन्सिल, स्केल आणि बॅग होती.
N Shivprasad

Visit :- policenama.com