Death Threat To Traffic Police In Pune | पुणे : मद्यपीकडून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Death Threat To Traffic Police In Pune | पुणे पोलीस आयुक्तालयाच्या (Pune CP Office) हद्दीत गेल्या काही दिवसांत पोलिसांवर हल्ले (Attacks On Police Officer) होण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असताना, तसेच वाहतूक शाखेतील पोलिसांवरही हल्ले होत आहेत. फरासखाना वाहतूक विभागात (Faraskhana Traffic Police Division) कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला एका मद्यपीने अंगावर धावून येत जीवे मारण्याची धमकी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा प्रकार सोमवारी (दि.15) सायंकाळी पावणे पाच ते साडेपाच या कालावधीत घडला आहे.(Death Threat To Traffic Police In Pune)

याप्रकरणी पोलीस शिपाई भाऊसाहेब सुखदेव बनकर (वय-36) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात
(Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन दत्ता मनिष गोमासे (वय-24 रा. श्री लॉज, तुळशीबाग, मंडई)
याच्यावर आयपीसी 353, 186, 323, 504 सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
केला आहे. आरोपीला सीआरपीसी 41(अ), 1 नुसार नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भाऊसाहेब बनकर हे सोमवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी रोडवर बुधवार चौकात सार्वजनिक वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी आरोपी मद्यपान करुन आला.
त्याने फिर्यादी यांना अश्लील शिवीगाळ केली तसेच त्यांच्या अंगावर धावून जाऊन गचांडी पकडली.
फिर्यादी यांच्यासोबत हुज्जत घालून त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन सरकारी काम करण्यापासून रोखले.
तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने आरडाओरडा करुन सार्वजनिक शांततेचा भंग केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Satara Lok Sabha Election 2024 | साताऱ्यातून अखरे उदयनराजे भोसलेंना भाजपाची उमेदवारी; भोसले विरूद्ध शिंदे सामना रंगणार

Vadgaon Sheri Pune News | पुणे : बागेत खेळणाऱ्या लहान मुलांसोबत अश्लील कृत्य, नारधमास अटक

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामतीसाठी अजित पवारांनीही घेतला उमेदवार अर्ज, हा प्लॅन ‘बी’ आहे की ‘ए’, राजकीय वर्तुळात चर्चा