Deccan Education Society | डीईएसच्या पूर्व प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Deccan Education Society | डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यायमूर्ती रानडे बालक मंदिर (Ranade Balak Mandir), डीईएस प्री प्रायमरी स्कूल, मा. स. गोळवलकर पूर्व प्राथमिक शाळा आणि न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक होती. (Deccan Education Society)

 

न्यायमूर्ती रानडे बालक मंदिरमध्ये सनईच्या सुरात फुलांच्या पायघड्या आणि फुग्यांची आरास करण्यात आली होती. विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत नटून आले होते.

डीईएस प्री प्रामयरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. सरस्वती पूजन, पपेट शो आणि बबल्स गेमचे आयोजन करण्यात आले होते.

मा. स. गोळवलकर पूर्व प्राथमिक शाळेत स्वागतासाठी फुग्यांची सजावट आणि बालगीते लावण्यात आली होती.
मुलांनी बगीच्यातील झोका, घसरगुंडी आणि सायकल खेळण्याचा आनंद घेतला. खाऊ वाटप करण्यात आले.

 

न्यू इंग्लिश मीडियम प्री – प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण केले,
मुलांनी परिचय करून दिला. गाणी, गोष्टी आणि खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

 

Web Title :-  Deccan Education Society | Enthusiastic welcome of students in DES pre primary schools

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा