Yashwant Jadhav | यशवंत जाधव गैरव्यवहार प्रकरण : प्राप्तिकर विभागाच्या रडारवर 12 शेल कंपन्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Yashwant Jadhav | आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी प्राप्तिकर विभाग (Income Tax Department Mumbai) मुंबई महापालिकेचे (BMC) स्थायी समितीचे अध्यक्ष (BMC Standing Committee Chairman) यशवंत जाधव (Yashwant Jadhav ) आणि त्यांची पत्नी आमदार यामिनी जाधव (MLA Yamini Jadhav) यांच्याकडे चौकशी (Inquiry) करत आहे. आता पर्यंतच्या चौकशीत अनेक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्राप्तिकराच्या रडारवर 12 शेल कंपन्या (12 Shell Companies) आल्या असून त्या कंपन्यांमधूनच आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या कंपन्यांमध्ये अंधेरी येथील एका कंपनीचा समावेश आहे.

 

प्राप्तिकर विभागाने गेल्या आठवड्यात यशवंत जाधव (Yashwant Jadhav) आणि त्यांचे निकटवर्तीयांसह 5 सिव्हिल कंत्राटदारांवर (Civil Contractors) छापेमारी केली. 33 ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या होत्या. अजूनही ही छापेमारी सुरू आहे. महत्त्वपूर्ण कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल दस्ताऐवज जप्त करत चौकशी सुरू आहे. दरम्यान प्राप्तिकर विभागाने 2 कोटी रकमेसह 10 बँक खात्यावर निर्बंध आणले आहेत. आता केवळ कोलकाता आणि युएईमधील बनावट कंपनी (Fake company in UAE) रडारवर होती मात्र आता आणखी काही कंपन्या रडारवर आल्या असून त्याची संख्या 12 झाली आहे. तपासात जी माहिती समोर आली आहे त्यावरून याच कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या कंपन्यांचे भागीदार कोण आहेत नेमके किती व्यवहार झाले या अनुषंगाने प्राप्तिकर विभागाने तपास सुरू केला आहे.

ईडीची एन्ट्री…
यशवंत जाधव यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बिमल अग्रवाल (Bimal Agarwal) यांच्याविरोधात ईडीने (ED) अहमदाबाद येथे गुन्हा (FIR) दाखल केला होता.
प्राप्तिकर विभागाने जाधव यांच्याबरोबरच अग्रवाल यांच्या मालमत्तांवरही छापा मारला होता.
त्यावेळी काही रक्कम जप्त केली होती.
एकूणच तपासात जाधव आणि अग्रवाल यांच्यातील व्यवहार समोर येत असून ईडीकडूनही तपास होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Web Title :- Yashwant Jadhav | financial malpractices committed by 12 shell companies income tax department suspects BMC Standing Committee Chairman yashwant jadhav case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा