Deepak Chahar | ‘13 कोटींच्या बोलीनंतर लिलाव थांबवावा वाटला’; धोनीच्या भिडूचा तुम्हालाही वाटेल अभिमान !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Deepak Chahar | आयपीएल ऑक्शनचा लिलाव (IPL Auction) पार पडला यामध्ये अनेकांना कोटींमध्ये तर काहींना लाखोंच्या घरात बोली लागली. यंदा सर्वाधिक बोली लागली इशान किशनला. त्याला तब्बल 15.25 कोटी इतकी बोली मुंबईने लावली. मात्र चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघातील खेळाडूने (Deepak Chahar) आपल्याला 13 कोटीच्या बोलीनंतर लिलाव प्रक्रिया थांबवावीशी वाटल्याचं सांगितलं.

 

चेन्नई सुपर किंग्ज संघात महेंद्र सिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) मार्गदर्शनाखाली खेळत असलेला गोलंदाज दीपक चीहर  (Deepak Chahar) म्हणाला की माझ्यासाठी 13 कोटींची बोली लागल्यानंतर लिलाव थांबवावा असं वाटत होतं. कारण मलाच इतकी बोली लागली तर एक संतुलित संघ करण्यासाठी अडचण ठरू शकते. मलाही पिवळ्याचं जर्सीमध्ये खेळायचं होतं, असं चाहरने सांगितलं.

 

आयपीएलच्या लिलावात सर्वात जास्त बोली लागणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दीपक चाहरने स्थान मिळवलं आहे.
मात्र आपल्याला बोली जास्त लागली तर संघ तयार करण्यासाठी अडचण येईल असा विचार करणारा दीपक तसा एकटाच म्हणावा लागेल.
आयपीएल (IPL) स्पर्धा जगभर प्रसिद्ध आहे. सर्व खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्याचं स्वप्न पाहतात.
दीपक नवीन होता तेव्हा धोनीने त्याला सुरूवातीच्या षटकांमध्ये म्हणजेच पॉवर प्लेमध्ये ओव्हर दिली.

 

दीपकनेही धोनीचा (Dhoni) निर्णय सार्थ ठरवत चमकदार कामगिरी करत भारतीय संघात आपली जागा भक्कम केली आहे.
यावेळी बोलताना दीपकने एक आठवण सांगितली ती म्हणजे. 2018 साली श्रीनिवास (Srinivasan) सरांना भेटलो तेव्हा ते म्हणाले
होते की तु पिवळ्या जर्सीमध्ये खेळशील. मी त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि रिटेन करण्यासंदर्भात कधीच कोणासोबत चर्चा केली नसल्याचं दीपकने सांगितलं.

 

Web Title :-  Deepak Chahar | after they spent 13 crore on me i actually wanted the bidding to stop deepak chahar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | अनैतिक संबंधातून महिलेचा गळा आवळून खून, मृतदेह बाथरुममध्ये टाकून फरार झालेल्या आरोपीच्या विमानतळ पोलिसांनी बिहारमधून आवळल्या मुसक्या

Shivajirao Adhalrao Patil | खा. अमोल कोल्हे यांच्या घोडेस्वारीवर शिवाजीराव आढळराव पाटलांचा निशाणा; म्हणाले…

BJP MLA | योगी आदित्यनाथ यांना मत दिलं नाहीतर घरे पाडू; भाजप आमदाराची धमकी