BJP MLA | योगी आदित्यनाथ यांना मत दिलं नाहीतर घरे पाडू; भाजप आमदाराची धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – BJP MLA | तेलंगणाचे भाजपचे (BJP) आमदार टी राजा सिंग (T. Raja Singh) यांनी एक व्हिडिओ ट्विट केला होता. त्यामध्ये ते मतदारांना उघडपणे धमकी देत होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. (BJP MLA)

 

योगींनी (Yogi Adityanath) हजारोंच्या संख्येने जेसीबी आणि बुलडोझर मागवले असून ते युपीच्या दिशेने येत आहेत. जेसीबी आणि बुलडोझर हे कशासाठी वापरतात हे तुम्हाला माहितीच असेल, असं राजा सिंग व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत.

 

 

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) जे गद्दार आहेत त्यांना सांगू इच्छितो की, युपीमध्ये राहायचं असेल तर योगी म्हणावच लागेल अन्यथा तुम्हाला युपी सोडून पळून जावं लागेल. फिर एक बार योगी सरकार, असं आमदार राजा सिंग व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत. (BJP MLA)

 

दरम्यान, यामुळे राजा सिंग यांना निवडणूक आयोगाने (Election Commission) नोटीस बजावली आहे.
या नोटीसमध्ये त्यांना 24 तासांमध्ये याबाबत खुलासा करण्यास सांगितलं आहे.

 

Web Title :- BJP MLA | t raja singh video threatening voters vote for yogi Adityanath in up polls or face jcb bulldozers

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा