Siddhant Vir Suryavanshi | सिद्धांत वीर सूर्यवंशीच्या निधनानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे ‘ते’ ट्विट चर्चेत

पोलीसनामा ऑनलाईन टीम : काल टेलिव्हिजन विश्वासाठी एक काळा दिवस होता असेच म्हणावे लागेल. अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी (Siddhant Vir Suryavanshi) चे काल वयाच्या 46 व्या वर्षी निधन झाले. ‘कुसुम’ (Kusum) ‘वारिस’ (Waaris) आणि ‘सूर्यपुत्र कर्ण’ (Suryaputra Karn) अशा मालिकांमुळे तो घराघरात पोहोचला होता. त्याच्या अभिनयाचे चाहते नेहमीच कौतुक करायचे. सिद्धांतच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. सिद्धांतच्या (Siddhant Vir Suryavanshi) माघारी त्याची पत्नी अलेशिया (Alesiya) आणि दोन मुले असा परिवार आहे.

 

सिद्धार्थच्या निधनाची बातमी जय भानुशालीने (Jay Bhanushali) सोशल मीडियावर सिद्धांतचा फोटो शेअर करत दिली होती. त्यानंतर मनोरंजन विश्वातील दिग्गजांनी यावर आपली प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली होती. तर ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी सिद्धांचा फोटो शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी कॅप्शनमध्ये असे लिहिले, “हे खूपच धक्कादायक आहे. शरीर कमावण्याच्या नादात कोणताही वैद्यकीय सल्ल्याशिवाय व्यायाम करणे हे धोकादायक आहे. ‘हायपर जीमिंग’ ही संकल्पना सध्या सोशल मीडियावर लोकांना वेडे करत आहे. एक समाज म्हणून या गोष्टीवर फेरविचार करायला हवा. ओह सिद्धांत ओम शांती”. अग्निहोत्री यांचे हे ट्विट सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

 

सिद्धांतने मॉडलिंग पासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
तर अनेक मालिकेमधून त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली होती.
‘कुसुम’ या हिंदी मालिकेतून त्यांनी टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केले होते.
त्यानंतर ‘कसोटी जिंदगी की’ (Kasoti Jindgi Ki), ‘कृष्णा अर्जुन’ (Krishna Arjun), ‘क्या दिल में है’ (Kya Dill Mein Hai),
‘तो क्यू रिश्तों में है कटी बट्टी’ (To Kyu Rishte Me Hai Katti Batti) आणि ‘जिद्दी दिल’ (Ziddi Dil)
अशा अनेक हिट मालिकेत त्यांनी उत्तम अशी कामगिरी करून चाहत्यांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले होते.
सिद्धार्थच्या (Siddhant Vir Suryavanshi) जाण्याने टेलिव्हिजन विश्वातच नाही तर त्याच्या चाहत्यांमध्ये देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

Web Title :- Siddhant Vir Suryavanshi | vivek agnihotri viral tweet abour late serial actor siddhant veer suryavnashi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा