राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याला ED चे समन्स

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावला आहे. हवाई वाहतूक उद्योगातील करारातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी पटेल यांना ईडीकडून समन्स बजावला आहे. प्रफुल्ल पटेल यांना ६ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.

हवाई वाहतूक उद्योगातील लॉबिस्ट दीपक तलवार याला आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी काही महिन्यांपूर्वी अटक झाली होती. दीपक तलवार हा सध्या तुरुंगात आहे. तीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग तलवारने मिळवून दिले होते. या मोबदल्यात तलवारला २००८- ०९ या कालावधीत २७२ कोटी रुपये मिळाले असल्याचा दावा ईडीने न्यायालयात केला होता.

माजी नागरी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांचा दीपक तलवार हा चांगला मित्र होता, असे देखील न्यायालयाने म्हटले होते. दीपक तलवारच्या अटकेनंतर प्रफुल्ल पटेल यांची देखील चौकशी होणार, अशी शक्यता होती. अखेर आज ईडीच्या वकिलांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना ईडीने प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावल्याची माहिती दिली आहे. ईडीने पटेल यांना ६ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like