Deepali Sayed | ‘मेलेल्या आईचं दूध पिऊन सत्तेत गेलात का ?’ – दीपाली सय्यद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत बंडखोरी (Shivsena Rebels) करुन भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदे गटावर (Eknath Shinde Group) शिवसेनेतील नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यामुळे आता कोणता झेंडा हाती घेऊ म्हणणाऱ्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी बंडखोर आमदारांवर (MLA) निशाना साधला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आमच्या कुटुंबासारखे आहेत. त्यामुळे चिन्हाबाबत जे व्हायचं ते होऊ द्या पण पक्ष प्रमुखांचे आदेश महत्त्वाचे असल्याचे सांगत दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या वक्तव्यावरुन शिंदे गटातील आमदारांना डिवचले आहे.

 

किरीट सोमय्या हे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काहीही बोलणार आणि ते तुम्ही ऐकून घेणार. हीच शिवसेना तुमच्या रक्तात भिनली आहे का म्हणत मेलेल्या आईचं दूध पिऊन सत्तेत गेलात का ? असे खडे बोल दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी बंडखोर आमदारांना सुनावले आहेत. तर दुसरीकडे शिवसेना तोडुन लढण्यापेक्षा जोडुन लढली तर शिवसैनिकाला आनंद असल्याचे ट्विट दीपाली सय्यद यांनी गुरुवारी केले होते.

https://twitter.com/deepalisayed/status/1545064263592873985?s=20&t=ufYbnHKrXxVRzT82gNNL1w

दीपाली सय्यद यांनी ट्विटमध्ये म्हटले, ‘शिवसेनेच्या आमदारांनो तुम्ही काय मेलेल्या आईचे दुध पिऊन सत्तेत गेलात का ? उद्धव साहेबांविरोधात चिरीट तोम्मय्या बोलणार आणि तुम्ही ऐकुन घेणार हिच का शिवसेना तुमच्या रक्तात भिनली आहे ? पहिले चिरीटला तुमच्या पंक्तीतुन बाहेर काढा नंतर शिवसैनिक नाव लावा’ अशा शब्दात बंडखोर आमदारांवर सय्यद यांनी निशाणा साधला आहे.

 

शिंदे गट अन् शिवसेना एकीबाबत आशावादी

दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, शिवसेना तोडुन लढण्यापेक्षा जोडुन लढली तर शिवसैनिकांना आनंद आहे.
आदरणीय उद्धव साहेब व शिंदे साहेब यांना एकत्र करण्यासाठी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी व पक्षा बाहेरुन मा. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) साहेबांनी मध्यस्थी करावी,
मोदी साहेबांचा शब्द उद्धव साहेब व शिंदे साहेब टाळणार नाहीत हिच एक आशा आहे.

 

Web Title :- Deepali Sayed | bjp kirit somaiyas statement is very wrong deepali sayyed tells rebel mlas

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा