Sanjay Raut | ’धनुष्यबाण’ हातातून जाण्याची शक्यता; शिवसेना खासदार संजय राऊतांचे सूचक ट्विट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut | भाजपाला (BJP) हाताशी धरून बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Rebel Leader Eknath Shinde) यांनी शिवेसेनेत (Shivsena) केलेल्या बंडामुळे शिवसेना पुरती हादरून गेली आहे. पक्ष संघटनेचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party Chief Uddhav Thackeray) यांच्यासह प्रमुख नेते कामाला लागले आहेत. न्यायालयीन लढ्यात नक्की कोणता न्याय मिळेल याचा अंदाज आणि शाश्वती नसल्याने पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण सुद्धा हातातून जाऊ शकते, असे शिवसेना नेत्यांना वाटू लागले आहे. यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक ट्विट केले आहे.

 

शिवसैनिकांनो, वेळ पडल्यास नव्या चिन्हावर (Shivsena Symbol) लढायची तयारी ठेवा, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही दिले आहेत. या संदर्भात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुद्धा एक सूचक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जब ‘खोने‘के लिए कुछ भी ना बचा हो तो ‘पाने‘ के लिए बहुत कुछ होता हैं! जय महाराष्ट्र !. राऊत यांच्या या ट्विटचे अनेक अर्थ लावले जात आहेत.

 

न्यायालयीन लढाईत पराभव झाल्यास ’धनुष्यबाण’ (Dhanushya Ban) हे चिन्ह सोडावे लागू शकते, याची जाणीव उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना झाली असावी का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना खरी की एकनाथ शिंदेंची, असा प्रश्न आहे. नवीन पक्षांतर कायद्यानुसार, वेगळ्या झालेल्या गटाला अन्य पक्षात विलिन होणे आवश्यक आहे. परंतु यामध्ये निवडणूक आयोगाची (Election Commission) भूमिका महत्वाची ठरणार आहे. निवडणूक आयोग शिवसेनेची ओळख असलेले ’धनुष्यबाण’ हे चिन्हच गोठवू शकते.

 

 

एकनाथ शिंदे यांनी पक्षातील दोन तृतीयांश आमदार आपल्या सोबत नेल्याने मुळ शिवसेना पक्षाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
बंडखोरी नंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील संख्याबळाच्या आधारावर पक्षावरच हक्क सांगितला आहे.
शिंदे गटाने (Shinde Group) आगामी काळात शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरच निवडणुका लढवण्याची योजना आखली आहे.
यासाठी न्यायालयीन लढाईत एकनाथ शिंदे गटाला भाजपकडून आवश्यक ती सर्व रसद पुरवली जाणार असल्याने शिवसेनेच्या गोटात चिंता व्यक्त केली जात आहे.
हा प्रश्न निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेल्यास शिवसेना जास्त अडचणीत येण्याची शक्यता आहे.

 

कायदेतज्ज्ञ, घटनातज्ज्ञ यांच्याशी शिवसेना सातत्याने चर्चा करत आहे.
परंतु दुर्दैवाने अपयश आले तर धनुबाणाशिवाय निवडणूक लढण्यासाठी तयार रहा असा
संदेश शिवसेना नेत्यांकडून शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना दिला जात आहे.

 

Web Title :- Sanjay Raut | shvisena may loose paty symbol bow and arrow dhanushya ban sanjay raut tweet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Eknath Shinde | CM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होणार, खातेवाटपावर चर्चा?

 

Maharashtra Congress | काँग्रेसनं मोठा निर्णय घेतल्यानं शिवसेनेला मोठा धक्का ?

 

Deepak Kesarkar | दिपक केसरकरांचं मोठं विधान; म्हणाले – ‘वेळ गेलेली नाही, उद्धव ठाकरे भाजपाच्या वरिष्ठांशी बोलले तर…’